Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-EU FTA : युरोप आणि भारताची ‘महायुती’! ट्रम्प प्रशासन आक्रस्ताळ्या भूमिकेत; अमेरिकेने युरोपला ठरवले ‘देशद्रोही

India-EU Trade Deal : युरोप सध्या अमेरिकेशी संघर्ष करत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताशी असलेले संबंध बिघडवले आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या भारत भेटीमुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 26, 2026 | 08:27 PM
india eu mother of all deals trump admin slams europe traitor republic day 2026

india eu mother of all deals trump admin slams europe traitor republic day 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • २७ जानेवारीला ऐतिहासिक स्वाक्षरी
  • अमेरिकेचा युरोपवर प्रहार
  • प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त

India EU Free Trade Agreement 2026 news : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जगभरातील राजकारणात एक मोठी खळबळ माजली आहे. एकीकडे नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले, तर दुसरीकडे पडद्यामागे भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात ‘शताब्दीतील सर्वात मोठा’ व्यापार करार अंतिम झाला आहे. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (Mother of All Deals) असे संबोधले जात आहे. मात्र, या करारामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन कमालीचे संतापले असून, त्यांनी युरोपवर गंभीर आरोप केले आहेत.

अमेरिकेचा ‘देशद्रोही’ असा आरोप का?

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी डॅव्होस (Davos) येथील जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना युरोपवर आगपाखड केली. बेझंट म्हणाले की, “आम्ही युक्रेन युद्धासाठी रशियाचा निधी रोखण्यासाठी भारताकडून आयात होणाऱ्या तेलावर २५% टॅरिफ लादले, पण आमच्या तथाकथित युरोपीय मित्रांनी आम्हाला साथ दिली नाही. उलट, ते भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.” त्यांनी युरोपला ‘Virtue Signaling’ (केवळ देखावा करणारे) म्हणत, युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धालाच वित्तपुरवठा करत असल्याचा घणाघाती आरोप केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा

काय आहे ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’?

भारत आणि २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनमधील या मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटी २००७ मध्ये सुरू झाल्या होत्या. तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा करार आता प्रत्यक्षात येत आहे.

  • २ अब्ज लोकांची बाजारपेठ: हा करार जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला (भारत) जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी गटाशी (EU) जोडेल.
  • टॅरिफमध्ये मोठी कपात: कापड, चामड्याच्या वस्तू, रसायने आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल.
  • ऑटोमोबाईल क्षेत्राला फायदा: युरोपियन कारवरील आयात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असून, यामुळे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या स्वस्त होऊ शकतात.

 

US Treasury Secretary Scott Bessent says EU has refused to put tariffs on India because they ‘want to sign big trade deal with India’. Calls actions of Europeans ‘act of stupidity’ for buying refined energy from India. pic.twitter.com/7XLz1q2BZn — Sidhant Sibal (@sidhant) January 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China OIC : मध्य पूर्वेचा नवा ‘डॉन’? अमेरिकेला रोखण्यासाठी 57 मुस्लिम देशांना सोबत घेऊन बीजिंगची मोठी खेळी; ‘जंगली कायदा’ हेच कारण

रशियन तेल आणि अमेरिकेचा तिळपापड

स्कॉट बेझंट यांनी युरोपच्या भूमिकेला ‘मूर्खपणाचा परमोच्च बिंदू’ म्हटले आहे. त्यांच्या मते, भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करतो, ते शुद्ध करतो (Refined Oil) आणि नंतर तेच तेल युरोपियन देश चढ्या दराने खरेदी करतात. अमेरिकेचा दावा आहे की, भारतावर दबाव टाकण्यासाठी युरोपलाही टॅरिफ लावणे गरजेचे होते, पण युरोपला भारतासोबतचा हा महाकरार गमवायचा नव्हता. यामुळेच ट्रम्प प्रशासनाने युरोपला एक प्रकारे ‘धोकेबाज’ ठरवले आहे.

भारताचे धोरणात्मक यश: ‘हेंजिंग’ (Hedges)

तज्ज्ञांच्या मते, हा करार केवळ व्यापारी नाही तर तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांना दिलेले एक उत्तर आहे. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% पर्यंत टॅरिफ लावण्याची धमकी दिली असताना, भारताने युरोपशी हातमिळवणी करून आपल्या बाजारपेठा सुरक्षित केल्या आहेत. यालाच ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’ (धोरणात्मक स्वायत्तता) म्हटले जात आहे. उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा यांची प्रजासत्ताक दिनाची उपस्थिती हे सिद्ध करते की, युरोप आता अमेरिकेच्या दबावाखाली न राहता भारताला आपला प्रमुख धोरणात्मक भागीदार मानत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणजे नक्की काय?

    Ans: भारत आणि २७ युरोपीय देशांमधील हा 'मुक्त व्यापार करार' (FTA) असून, यामुळे ९०% पेक्षा जास्त वस्तूंवरील आयात शुल्क रद्द होईल. हा जगातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे.

  • Que: अमेरिका या करारावर नाराज का आहे?

    Ans: अमेरिकेच्या मते, युरोप भारताकडून रशियन कच्च्या तेलापासून बनलेली उत्पादने खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियाला युद्धात मदत करत आहे आणि भारतावर दबाव टाकत नाहीये.

  • Que: या करारामुळे सामान्य भारतीयाला काय फायदा होईल?

    Ans: भारतीय कापड, दागिने आणि फार्मा क्षेत्रातील निर्यात वाढल्याने लाखो रोजगार निर्माण होतील, तसेच युरोपीय आयात स्वस्त झाल्याने काही हाय-एंड गाड्या आणि वाइनच्या किमती कमी होऊ शकतात.

Web Title: India eu mother of all deals trump admin slams europe traitor republic day 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • America
  • india
  • International Trade

संबंधित बातम्या

Nouri Al Maliki: इराकचे हवाई क्षेत्र आता इराणच्या ताब्यात? नूरी अल-मलिकींच्या पुनरागमनाने अमेरिकेची उडाली झोप
1

Nouri Al Maliki: इराकचे हवाई क्षेत्र आता इराणच्या ताब्यात? नूरी अल-मलिकींच्या पुनरागमनाने अमेरिकेची उडाली झोप

10 वी पास अन् पगार 46000 हून अधिक! RBI ची ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरतीची घोषणा
2

10 वी पास अन् पगार 46000 हून अधिक! RBI ची ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरतीची घोषणा

Finger On Trigger : समुद्रात रक्ताचा पूर अन्…, इराणच्या ‘त्या’ पोस्टरने अमेरिकेची झोप उडवली,  तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?
3

Finger On Trigger : समुद्रात रक्ताचा पूर अन्…, इराणच्या ‘त्या’ पोस्टरने अमेरिकेची झोप उडवली, तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?

India-EU Free Trade: ७७ व्या प्रजासत्ताक दिनी भारत-EU संबंध ऐतिहासिक ठरणार! मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात
4

India-EU Free Trade: ७७ व्या प्रजासत्ताक दिनी भारत-EU संबंध ऐतिहासिक ठरणार! मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.