Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने डाव टाकला, बांगलादेशची केली गळचेपी; आर्थिक नुकसान अनिवार्य

भारताने बांगलादेशला मोठा धक्का दिला ‘ट्रान्सशिपमेंट’ करार रद्द केला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश भारतीय भूपृष्ठ मार्ग व भारतीय विमानतळांचा वापर करून नेपाळ, भूतान आणि म्यानमारला वस्तू निर्यात

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 12, 2025 | 12:19 PM
India cancels transhipment deal with Bangladesh financial losses expected

India cancels transhipment deal with Bangladesh financial losses expected

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत सरकारने बांगलादेशला मोठा धक्का देणारा निर्णय घेत ‘ट्रान्सशिपमेंट’ करार रद्द केला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश भारतीय भूपृष्ठ मार्ग व भारतीय विमानतळांचा वापर करून नेपाळ, भूतान आणि म्यानमारला वस्तू निर्यात करू शकणार नाही. यामुळे बांगलादेशला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

भारत सरकारच्या या कठोर निर्णयामागे बांगलादेश सरकारच्या अलीकडील भारतविरोधी भूमिकेचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी चीनची स्तुती करताना बांगलादेशला चीनच्या विस्तारित क्षेत्राचा भाग समजावे, अशी टीका केली होती. तसेच त्यांनी चितगावच्या सागरी बेटाचा चीनने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून वापर करावा, अशी वादग्रस्त सूचना दिली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका-चीन Tariff War घमासान; कोण घेणार माघार अन् वरचढ?

चिकननेकचा उल्लेख आणि भारताची संवेदनशीलता

युनुस यांनी त्यांच्या वक्तव्यात भारतातील अत्यंत संवेदनशील क्षेत्र ‘चिकननेक’ (सिलिगुडी कॉरिडॉर) चा उल्लेख केला होता. हे क्षेत्र भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य भागाशी जोडणारे महत्त्वाचे भौगोलिक स्थान आहे. युनुस यांच्या विधानानुसार, “भारताच्या पूर्वेकडील राज्यांकडे सागरी किनारे नाहीत आणि त्यांना व्यापारासाठी बांगलादेशावरच अवलंबून राहावे लागते.” या विधानामुळे भारत सरकारच्या सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आणि बांगलादेशची भूमिकाच चीनला निमंत्रण देणारी आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे भारताने तातडीने ट्रान्सशिपमेंट करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

#BreakingNews
India has unilaterally canceled the transshipment agreement to Nepal, Bhutan & Myanmar to restrict Bangladesh’s trade growth.

Yet, India itself is using free transit and corridor through the heart of Bangladesh.

This shows how petty and narrow-minded some people… pic.twitter.com/6X7hZd8lkd

— Kedar (@Kedar_speaks88) April 9, 2025

credit : social media

आर्थिक परिणाम आणि भारताचा फायदा

या निर्णयामुळे बांगलादेशचा वस्त्र निर्यात उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारताच्या टेक्सटाईल आणि रेडिमेड गारमेंट उद्योगाला या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. भारत आता स्वतःच्या भूपृष्ठ मार्गांचा अधिक परिणामकारक वापर करून, बांगलादेशच्या जागेवर नवीन बाजारपेठांमध्ये घुसखोरी करू शकतो. विशेषत: बांगलादेशच्या वस्त्र निर्यातीचा मोठा हिस्सा भारतातून होणाऱ्या ट्रान्सशिपमेंटवर अवलंबून होता. आता ही सुविधा बंद झाल्यामुळे बांगलादेशची निर्यात विस्कळीत होणार असून, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.

बांगलादेश-चीन जवळीक आणि भारताचा रोष

बांगलादेशकडून अलीकडे चीन आणि पाकिस्तानसोबत वाढती जवळीक भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. भारतासारख्या मोठ्या आणि शक्तिशाली शेजारी देशाच्या असंतोषाकडे दुर्लक्ष करून बांगलादेश जी भूमिका घेत आहे, ती त्यांच्याच हिताविरुद्ध ठरणार आहे. याशिवाय, बिमस्टेक शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनुस यांची भेट झाली होती. या भेटीत भारताने बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. मोदींनी स्पष्ट शब्दांत या हल्ल्यांना आळा घालण्याची सूचना केली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डॉलर घसरला! अमेरिकेन अर्थव्यवस्था धोक्यात, ट्रम्पची टॅरिफ योजना ठरतेय एक मोठे जागतिक संकट

 भारतविरोधी धोरणांची किंमत

भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या नेतृत्वाला आता हे लक्षात येईल की, शेजारी देशाशी असलेले संबंध आणि त्यांच्या सुरक्षेचा आदर राखणे किती महत्त्वाचे असते. मोहम्मद युनुस यांचे बेजबाबदार आणि आपत्तीजनक वक्तव्य केवळ त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला धक्का पोहोचवत नाही, तर बांगलादेशच्या व्यापारी हितांनाही धोक्यात आणते. भारताने ‘ट्रान्सशिपमेंट’ करार रद्द करून बांगलादेशला एक प्रकारचा धडा शिकवला आहे.  की चीनच्या जवळीकेतून शहाणपण न गमावता, भूपोलिटिकदृष्ट्या भारताशी सहकार्य ठेवणे अधिक हिताचे ठरते.
बांगलादेशच्या अविचारी धोरणाचा फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Web Title: India cancels transhipment deal with bangladesh financial losses expected nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • international news
  • nepal

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
2

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
3

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
4

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.