चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध निश्चित, ट्रम्पची टॅरिफ योजना एक मोठे जागतिक संकट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध आता थेट लष्करी संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांनी जगात मोठे आर्थिक आणि सामरिक संकट निर्माण केले आहे. चीनविरोधातील कर दर १४५ टक्क्यांपर्यंत वाढवून, ट्रम्प प्रशासनाने चीनवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले, आणि दोन्ही महासत्तांमध्ये थेट टक्कर होण्याचे संकेत मिळत आहेत. टॅरिफ युद्ध सुरू असताना शांतता प्रस्थापित करण्याच्या कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. विश्लेषकांच्या मते, हे केवळ आर्थिक युद्ध न राहता, भविष्यात विनाशकारी युद्धातही रूपांतर होऊ शकते.
या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरतो आहे पनामा कालवा, जिथे चीनच्या वाढत्या वर्चस्वाला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, “पनामावर चीनचा प्रभाव संपवण्यासाठी आम्ही कालवा परत घेत आहोत.” या मोहिमेला ट्रम्प यांचा दुजोरा मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अमेरिकी सैन्य पनामात तैनात करण्यात आले आहे. ही कारवाई केवळ सामरिक नव्हे तर आर्थिक महत्त्वाची आहे. पनामाचा नियंत्रण गमावल्यास अमेरिकेच्या व्यापार वाहिन्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि चीनच्या महत्त्वाकांक्षेला थेट चाप बसतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डॉलर घसरला! अमेरिकेन अर्थव्यवस्था धोक्यात, ट्रम्पची टॅरिफ योजना ठरतेय एक मोठे जागतिक संकट
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संतप्त झालेल्या चीननेही प्रत्युत्तरादाखल बहुआयामी रणनिती स्वीकारली आहे.
1) तैवानला वेढा घालण्यास सुरुवात
2) दक्षिण चीन समुद्रात सैन्यविस्तार
3) जपान व दक्षिण कोरियाच्या सीमांवर हालचाली
4) युरोपियन युनियन व संयुक्त अरब अमिरातीसोबत व्यापारी सहकार्य
या हालचाली चीनच्या जागतिक बाजारपेठेतील वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या दिशेने आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून बीजिंगमध्ये युरोपियन युनियनसोबत परिषद आयोजित केली जाणार असून, इलेक्ट्रिक वाहनांवरील अमेरिकी हस्तक्षेपाशिवाय नवीन व्यापार चौकट तयार केली जाईल.
“My bad. I assumed economic rationality would be paramount.”
Global Trade is enormously complex. Trump has put 104% tariffs on China – which will directly impact US consumers. Shutting the door on global trade will inevitably trigger consequences. The…
— Bill Blain (@Bill_Blain) April 9, 2025
टॅरिफ युद्ध थेट युद्धात रूपांतर होण्याच्या भीतीने अमेरिकेने लष्करी स्तरावर तयारी सुरू केली आहे.
1. पनामा व इंडो-पॅसिफिकमध्ये सैन्य तैनात
2. जपानमधील ओकिनावा बेटावरून गुप्त नजरदारी
3. दक्षिण चीन समुद्रात पाणबुडी हालचाली
4. दक्षिण सीमांवर, विशेषतः मेक्सिकोशी लागून, लष्करी वाढ
ट्रम्प यांना चीनच्या मदतीने मेक्सिको अमेरिकेविरुद्ध कट रचू शकतो, अशी शंका असून, टेक्सासमध्ये ५० एम-११२६ स्ट्रायकर वाहने तैनात करण्यात आली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हजारो करोडपती का सोडत आहेत लंडन? अहवालात धक्कादायक माहिती आली समोर
अमेरिका आणि चीनमधील तणावाच्या या पार्श्वभूमीवर, जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि शांततेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. टॅरिफ वॉर आता फक्त आर्थिक नव्हे तर सामरिक रणभूमीवरही विस्तृत होत आहे. एकीकडे चीन आक्रमक तयारी करत आहे, तर दुसरीकडे अमेरिका त्याला वेढा घालण्याच्या प्रयत्नात आहे. जगभरातील राष्ट्रांनी आता शांततेसाठी पुढाकार न घेतल्यास, हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीन आणि अमेरिकेतील हा संघर्ष केवळ दोन्ही राष्ट्रांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला संकटात टाकू शकतो.