Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-China Border Tension: भारतानेही करारांचा आदर करावा…; सीमावादावर चीनची पहिली प्रतिक्रीया

India-China Border Tension: अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) विशिष्ट ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अलीकडेच चकमकी झाल्या होत्या, ज्या अजूनही सुरू आहेत. असे सांगितले, तेव्हापासून हे प्रकरण समोर आले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Oct 26, 2026 | 04:13 PM
India China Border Tension 2026, ITBP DG Shatrujeet Kapoor, Arunachal Pradesh LAC Standoff,

India China Border Tension 2026, ITBP DG Shatrujeet Kapoor, Arunachal Pradesh LAC Standoff,

Follow Us
Follow Us:
  • भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव
  • चीन आणि भारत राजनैतिक आणि लष्करी मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात
  • आयटीबीपीचे महासंचालक (डीजी) शत्रुजीत कपूर यांच्या वक्तव्यानंतर चीनची प्रतिक्रीया
India-China Border Tension : आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या दोन्ही देशांमधील तणावाची माहिती दिली होती. दोन्ही देशांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच भारतीय सैन्याकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचेही त्यानी नमुद केले. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची देशभरात चर्चा सुरू आहे.

अशातच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी (२६ ऑक्टोबर) त्यांचे सैन्य सामान्य सीमा गस्त घालते. चीन सर्व नियमांचे पालन करतो आणि भारताकडूनही तीच अपेक्षा करतो.” अस चीनने म्हटले आहे. तसेच, “भारतासोबत राजनैतिक संवादाचा मार्ग नेहमीच खुला राहील. चीनला आशा आहे की भारत देखील परस्पर करारांचा आदर करेल आणि शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलेल. सीमावर्ती भागांमध्ये याकडे विशेष लक्ष दिले जाईल.” असंही त्यांनी नमुद केलं आहे.

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद

भारतासोबतच्या सीमावादावर चीनने काय म्हटले?

या प्रकरणी, जेव्हा चिनी सैन्य “निश्चित गस्त मार्गांपासून विचलित होते, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्यामुळे अशांतता निर्माण होते. चीन आणि भारत राजनैतिक आणि लष्करी मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सीमावर्ती भागात शांतता व स्थिरता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता भारतदेखील या दिशेने काम करेल.

चीनसोबतच्या सीमावादावर भारताने काय म्हटले?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही पूर्वी कळवल्याप्रमाणे, जेव्हा चिनी सैन्य ठरलेल्या गस्तीच्या मार्गांपासून विचलित होते, तेव्हा भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थिती वेळोवेळी बिघडते. सीमा व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही विशिष्ट भागांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (LAC) परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासही दोन्ही बाजू सहमत झाल्या आहेत.

World News : सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

भारत आणि चीन यांच्यातील नवा सीमा विवाद काय?

आयटीबीपीचे महासंचालक (डीजी) शत्रुजीत कपूर यांनी गुरुवारी जाहीरपणे दोन्ही देशांमधील तणावावर भाष्य केले होते. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) विशिष्ट ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अलीकडेच चकमकी झाल्या होत्या, ज्या अजूनही सुरू आहेत. असे सांगितले, तेव्हापासून हे प्रकरण समोर आले आहे

एलएसीवर तैनात असलेल्या त्यांच्या दलाच्या ‘शौर्य’ कमांडोंनी ही परिस्थिती हाताळण्यात ‘उत्कृष्ट कामगिरी’ केली आहे.भारत आपल्या ड्रोन आणि ड्रोनविरोधी क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, कारण पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) सामना करण्यासाठी ‘पारंपरिक’ लष्करी संसाधने आणि पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याचेही शत्रुजीत कपूर यांनी सांगितले होते.

पण त्याचवेळी पीएलएने आपल्या क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि आधुनिकीकरण केले आहे, ज्यामुळे चीन एक ‘अत्यंत प्रबळ प्रतिस्पर्धी’ बनला आहे. आयटीबीपीने आपल्या सर्व सीमा युनिट्समध्ये ड्रोन प्लाटूनचा समावेश केला आहे. गृह मंत्रालयाने (एमएचए) दलाच्या आधुनिकीकरणासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यापैकी ७०% रक्कम विशेषतः ड्रोन युद्ध क्षमता वाढवण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. तसेच, हे दल पर्वतीय युद्ध, नवीन पिढीची शस्त्रे आणि निःशस्त्र लढाईचे प्रशिक्षण घेतलेल्या ‘शौर्य’ कमांडोंच्या अतिरिक्त तुकड्याही तयार करत आहे.

China has consistently and strictly abided by the relevant agreements and important understandings between the two countries, conducting routine patrols and management activities in the #border areas to safeguard territorial sovereignty and border stability, Chinese #FM spokesperson Guo Jiakun said on Monday. He made these remarks in response to reports of another standoff along the #China-#India border, where an Indian Foreign Ministry spokesperson claimed such incidents occur when Chinese troops “deviate from established patrolling patterns.” China and India remain in communication through diplomatic and military channels, Guo said. China hopes India will work in the same direction to jointly implement the understandings reached by both sides and take concrete steps to maintain peace and tranquility in the border areas, said Guo. https://t.co/V5UlKcxmls — Global Times (@globaltimesnews) October 26, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेबाबत ITBP महासंचालकांनी काय माहिती दिली होती?

    Ans: ITBP चे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी सांगितले होते की अरुणाचल प्रदेश सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यात सातत्याने तणाव व संघर्ष सुरू असून भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

  • Que: सीमेवरील या तणावावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले आहे?

    Ans: चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की त्यांचे सैन्य सामान्य गस्त घालते आणि भारताने करारांचा आदर करत सीमेवर शांतता राखण्यासाठी काम करावे.

  • Que: चिनी दाव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की चिनी सैन्य जेव्हा निश्चित केलेल्या गस्तीच्या मार्गांवरून विचलित होते, तेव्हाच सीमेवरील परिस्थिती बिघडते.

Web Title: India china border tension arunachal pradesh itbp dg statement as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • indian army
  • MEA

संबंधित बातम्या

Middle East Crisis: ‘आम्ही हतबल प्रेक्षक बनू शकत नाही…’; मध्य-पूर्व युद्धावर एस. जयशंकर यांचे मोठे विधान
1

Middle East Crisis: ‘आम्ही हतबल प्रेक्षक बनू शकत नाही…’; मध्य-पूर्व युद्धावर एस. जयशंकर यांचे मोठे विधान

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
2

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे

Indian Army Internship: भारतीय सैन्यात इंटर्नशिपची संधी! विद्यार्थ्यांना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड
3

Indian Army Internship: भारतीय सैन्यात इंटर्नशिपची संधी! विद्यार्थ्यांना मिळणार ७५,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक
4

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा, काँग्रेस आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.