Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

India-France Rafale Deal: भारत आणि फ्रान्समधील एक मोठा करार पूर्णत्वाच्या जवळ आला आहे, जो भारताची हवाई शक्ती वाढवेल. भारतीय हवाई दलाची वाढती ताकद पाकिस्तानला धक्का देईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 06, 2026 | 02:45 PM
india france 114 rafale deal macron visit iaf 150 jets pakistan impact

india france 114 rafale deal macron visit iaf 150 jets pakistan impact

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक करार
  • ‘मेक इन इंडिया’चा जोर
  • १५० राफेलचा ताफा

India France 114 Rafale deal 2026 : भारतीय हवाई दलाची ताकद आता अशा उंचीवर पोहोचणार आहे, जिथे शत्रूला पाहण्यापूर्वीच त्याचा अंत निश्चित असेल. १८ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन नवी दिल्लीत होणाऱ्या ‘AI समिट’साठी भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भारत आणि फ्रान्समध्ये (India-France Rafale Deal) संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा, ३.२५ लाख कोटी रुपयांचा राफेल करार (114 Rafale Deal) पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. हा करार म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि चिनी ड्रॅगनसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे.

३.२५ लाख कोटींचा मास्टर प्लॅन आणि ११४ राफेल

भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे स्क्वॉड्रनची संख्या कमी झाली आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी हवाई दलाने ११४ ‘मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट’ (MRFA) खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. ताज्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने याला प्राथमिक मान्यता दिली आहे. या प्रस्तावांतर्गत ८८ सिंगल-सीटर आणि २६ ट्विन-सीटर राफेल विमाने खरेदी केली जातील. विशेष म्हणजे, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतंर्गत यातील बहुतांश विमाने फ्रान्सच्या ‘डी सॉल्ट’ (Dassault Aviation) कंपनीच्या सहकार्याने भारतातच खासगी कंपन्यांद्वारे उत्पादित केली जातील.

Deal for 114 Rafale fast-tracked, likely to announce during French President’s India visit this month. 🇮🇳 • Deal Cost: ₹3.25 lakh Cr
• Variants: F4 & F5
• Seat configuration: 88 single, 26 twin
• 1st batch Delivery: by 2030 est
• Total Rafales with IAF Post induction: 150 pic.twitter.com/C9YEd1hz3q
— Defence Core (@Defencecore) February 5, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Space War 2026: रशियाची गुप्तचर याने युरोपीय उपग्रहांच्या मानगुटीवर; संपूर्ण जगाला ब्लॅकआऊटचा धोका, स्टारलिंकवर अणुहल्ल्याची धमकी

ऑपरेशन सिंदूर (May 2025): जेव्हा राफेलने पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले!

या कराराची चर्चा अशा वेळी रंगली आहे, जेव्हा मे २०२५ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान राफेलने आपली ताकद सिद्ध केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये राफेल विमानांनी स्कॅल्प (SCALP) मिसाईल्स आणि हॅमर बाँब्सचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानच्या जेएफ-१७ (JF-17) विमानांना राफेलच्या ‘स्पेक्ट्रा’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणेने असे काही गोंधळात टाकले की, त्यांचे राडार आणि क्षेपणास्त्रे निकामी ठरली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Talks: ‘इराण झुकणार नाही!’ मस्कतमध्ये अणु चर्चेचा महासंग्राम; अराघची यांचा अमेरिकेला निर्भय शब्दांतला खरमरीत इशारा

१५० राफेलचा ‘सुपर ताफा’ आणि मुनीर यांची भीती

सध्या भारताकडे ३६ राफेल विमाने हवाई दलात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, नौदलासाठी २६ राफेल-एम (Marine) विमानांची ऑर्डर आधीच देण्यात आली आहे. आता ११४ नवीन विमानांच्या करारानंतर भारतीय सैन्याकडे एकूण १५० पेक्षा जास्त राफेल असतील. पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या जे-१०सी (J-10C) किंवा अमेरिकन एफ-१६ (F-16) विमानांमध्ये राफेलच्या ‘मिटियर’ (Meteor) क्षेपणास्त्राचा सामना करण्याची ताकद नाही. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हा करार पूर्ण झाल्यापासून अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानच्या हवाई वर्चस्वाचा फुगा फुटेल आणि जनरल असीम मुनीर यांना रक्ताचे अश्रू ढाळावे लागतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत किती नवीन राफेल विमाने खरेदी करणार आहे?

    Ans: भारत सरकार ११४ नवीन राफेल लढाऊ विमाने (MRFA प्रोग्राम अंतर्गत) खरेदी करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.

  • Que: या करारात 'मेक इन इंडिया'चे महत्त्व काय आहे?

    Ans: या प्रस्तावातील ८०% विमाने भारतातच उत्पादित केली जातील, ज्यामुळे भारतीय खासगी कंपन्यांना रोजगार आणि तंत्रज्ञान मिळेल.

  • Que: राफेल विमान पाकिस्तानच्या विमानांपेक्षा श्रेष्ठ का आहे?

    Ans: राफेलमध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (Spectra) आणि १५० किमी पेक्षा जास्त रेंजचे मिटियर क्षेपणास्त्र आहे, जे पाकिस्तानच्या कोणत्याही विमानाला कळण्यापूर्वीच नष्ट करू शकते.

Web Title: India france 114 rafale deal macron visit iaf 150 jets pakistan impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • French President Emmanuel Macron
  • india
  • India-France
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
1

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
2

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
4

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.