भारतासोबत ३६ अब्ज डॉलर्सची राफेल मेगा डील केल्यावर फ्रान्स होईल मालामाल, पहा किती वाढेल जीडीपी? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India France Rafale 114 jets deal 2026 : भारतीय हवाई दलाची (IAF) ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येत असून, या काळात ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. सुमारे ३६ अब्ज डॉलर्स (३.२५ लाख कोटी रुपये) किमतीचा हा करार केवळ भारताची सुरक्षा मजबूत करणार नाही, तर फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेलाही (GDP) मोठी चालना देणार आहे.
फ्रेंच संरक्षण वेबसाईट ‘एव्हियन्स लेजेंडेयर्स’ नुसार, भारत राफेलची सध्याची सर्वात प्रगत ‘F4’ आवृत्ती खरेदी करणार आहे. या कराराचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भविष्यातील ‘F5’ मानक. भारत आपल्या ताफ्यातील विमानांना स्वतंत्रपणे ‘F5’ मध्ये अपग्रेड करू शकेल का, यावर सध्या दोन्ही देशांत वाटाघाटी सुरू आहेत. F5 ही राफेलची अशी आवृत्ती असेल जी ‘लॉयल विंगमॅन’ (Loyal Wingman) ड्रोनला नियंत्रित करू शकेल आणि शत्रूच्या रडारला चकवा देण्याची अफाट क्षमता यात असेल.
हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये राफेलने चीनच्या ‘PL-15’ क्षेपणास्त्राला आपल्या ‘स्पेक्ट्रा’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटच्या मदतीने निष्प्रभ केले होते. या कामगिरीमुळे भारतीय हवाई दलाचा राफेलवरील विश्वास कमालीचा वाढला आहे. याच यशामुळे आता ११४ विमानांचा हा मेगा प्रोजेक्ट ‘गव्हर्नमेंट-टू-गव्हर्नमेंट’ (G2G) मार्गाने वेगाने पुढे नेला जात आहे.
How is the India–France Relationship Evolving in Innovation and Technology? New Delhi, Jan 13 (NationPress) PM Modi expressed optimism about the expanding
India–France ties in a meeting with Emmanuel Bonne, Macron’s advisor,
highlighting innovation… https://t.co/x7xncK7FoY pic.twitter.com/FZzILwIdJX — NationPress (@np_nationpress) January 13, 2026
credit : social media and Twitter
या करारांतर्गत ९० विमाने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेखाली भारतातच तयार केली जाण्याची शक्यता आहे. नागपूर येथील ‘दसॉल्ट रिलायन्स’ (DRAL) प्रकल्प किंवा टाटा समूहासोबतच्या भागीदारीतून ही विमाने तयार केली जाऊ शकतात. या महाकरारामुळे फ्रान्सच्या संरक्षण उद्योगाला इतकी मोठी ऑर्डर मिळणार आहे की, त्याचा थेट परिणाम फ्रान्सच्या राष्ट्रीय जीडीपीवर होईल. फ्रेंच माध्यमांच्या मते, या करारामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत काही टक्क्यांची भर पडेल.
१६ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘AI इम्पॅक्ट समिट’साठी मॅक्रॉन भारतात येणार आहेत. या दौऱ्यात लढाऊ विमानांसोबतच ‘स्कॉर्पीन’ पाणबुड्या आणि जेट इंजिन तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. भारतीय हवाई दलातील स्क्वॉड्रन्सची कमतरता भरून काढण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरणार आहे.
Ans: हा करार सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांचा (अंदाजे ३६ अब्ज डॉलर्स) असून यात ११४ विमानांचा समावेश आहे.
Ans: हो, प्रस्तावित करारातील बहुतांश विमाने 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात स्थानिक कंपन्यांच्या सहकार्याने तयार केली जातील.
Ans: राफेल F5 हे भविष्यातील अद्ययावत मानक आहे, ज्यामध्ये स्टेल्थ क्षमता आणि ड्रोन कंट्रोल (Loyal Wingman) सारखी प्रगत वैशिष्ट्ये असतील.






