India FTA deal with 4 European Countries comes to effect
India sign FTA deal with 4 European Countries : नवी दिल्ली : एक मोठी बातमी आहे. भारताने चार युरोपीय देशांसोबत मुक्त व्यापार करार लागू केला आहे. यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिंकटेस्टाईन या EFTA (European Free Trade Agreement) या देशांचा समावेश आहे. बुधवारपासून (१ ऑक्टोबर) हा व्यापार करार लागू करण्यात आला आहे. हा करार भारताचा चार विकसित युरोपीय देशांसोबतचा पहिला मुक्त व्यापार करार आहे.
या करारांतर्गत भारत आणि चार युरोपीय देशांमध्ये गुंतवणूक, रोजगार वाढीवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. पुढील १५ वर्षात हे चार युरोपीय देश भारतात अंदाजे १०० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८.८६ लाख कोटी रुपये गुंतवणार आहेत. यामुळे देशात १० लाख नोकऱ्या होणार आहेत.
या देशांसोबत केला आहे भारताने FTA करार
भारताने आतापर्यंत १६ देशांसोबत (FTA) मुक्त व्यापार केला आहे. यात श्रीलंका, भूतान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, यूएई, यूके, मॉरिशस आणि आसियान या देशांचा समावेश आहे. सध्या भारत अमेरिका ओमान, पेरु, चिली, युरोपियन यूनियन, न्यूझीलंड, इस्रायलसोबतही मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहे.
प्रश्न १. मुक्त व्यापार करार (FTA) म्हणजे काय?
दोन किंवा अधिक देशांमध्ये होणारा मुक्त व्यापार करार ज्यामध्ये आयात-निर्यात शुल्क (Tarrif) कमी केले जाते आणि व्यापार सुलभो होतो, याला मुक्त व्यापार करार म्हणतात.
प्रश्न २. भारताने कोणत्या देशांसोबत लागू केला मुक्त व्यापार करार (FTA)?
भारताने देश स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइलँड आणि लिकटेंस्टाईन या चार विकसित युरोपीय देशांसोबत FTA करार लागू केला आहे.
प्रश्न ३. काय होईल या कराराचा फायदा?
या करारामुळे भारत आणि युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील, तसेच भारतात युरोपीय देशांची गुंतवणूक वाढेल, यामुळे शुल्क कमी होऊन युरोपीय उत्पादने भारतात स्वस्त होती.
प्रश्न ४. कोणत्या देशांसोबत भारताने केला आहे. FTA करार?
भारताने आतापर्यंत १६ देशांसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्यामध्ये श्रीलंका, भूतान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, यूएई, यूके, मॉरिशस आणि आसियान या देशांचा समावेश आहे.
प्रश्न २. भारत कोणत्या देशांसोबत करत आहे FTA करारावर चर्चा?
सध्या भारत अमेरिका ओमान, पेरु, चिली, युरोपियन यूनियन, न्यूझीलंड, इस्रायलसोबतही मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहे.