
America selling venezuelas 50 million barrels of crude oil
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
तेल कंपनींच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीआहे. तसेच व्हेनेझुएलाने तेलाच्या शुद्धीकरण आणि विक्रीसाठी अमेरिकेला मान्यता दिले आहे. ट्रम्प यांच्या मते, यामुळे केवळ व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्थाच नव्ह, तर अमेरिकन लोकांना देखील याचा लक्षणीय फायदा होणार आहेत.
दरम्यान या घडामोडींवेळीच ट्रम्प प्रशासनाकडून भारतासाठी महत्त्वाचे संकेत मिळाले आहे. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुलातून तेल खरेदी करण्यासाठी भारताला परवानगी देण्याची शक्यता आहे. सध्या भारताच्या उर्जा क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी भारताला कच्चा तेलाची मोठ्या प्रमाणात आयात गरजेची आहे. अशा परिस्थितीत भारताला व्हेनेझुएलाकडून तेल स्वस्त दरात मिळाल्यास अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. अमेरिकेच्या सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारताच्या तेल खरेदीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
#WATCH वेनेजुएला में तेल प्रोडक्शन बढ़ाने के लिए अमेरिकी तेल कंपनियों के अधिकारियों के साथ एक बैठक में अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, “हमारी बड़ी तेल कंपनियाँ कम से कम 100 बिलियन डॉलर खर्च कर रही हैं… ज़रूरी क्षमता और इंफ्रास्ट्रक्चर को फिर से बनाने के लिए…… pic.twitter.com/NKCdyt2NLG — ANI_HindiNews (@AHindinews) January 9, 2026
जागतिक स्तरावरील परिणाम
दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयाचा जागतिक बाजारपेठांवरही होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक तेलपुरवठा वाढेल, परंतु याच्यामुळे तेलाच्या किंमतीवर दबाव येईल. याचा फायदा तेल आयात करणाऱ्या देशांना, मुख्य करुन भारताला मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प व्हेनेझुएलाचे ५० दशलक्ष म्हणजेच ५ कोटी बॅरल तेल जागतिक बाजारपेठेत विकणार आहे.
Ans: भारताला व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्याची संधी मिळाल्यास, तेल स्वस्त दरात, पर्यायी साठा म्हणून उपलब्ध होईल. यामुळे भारताची उर्जा सुरक्षा बळकट होण्यास आणि तेल आयातीलवर खर्च कमी होण्यास मदत होईल.
Ans: यामुळे जागतिक तेलपुरवठा वाढेल, परंतु याच्यामुळे तेलाच्या किंमतीवर दबाव येईल. याचा फायदा तेल आयात करणाऱ्या देशांना होईल.