PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
PoJK Protest update in Marathi : पाकिस्तानच्या अधिकृत काश्मीरमध्ये (PoK) गेल्या तीन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरु आहे. जनतेचा संताप वाढत चालला आहे. स्थानिक नागरिकांना पाकिस्तान लष्करा आणि सरकारविरोधी आंदोलन सुरु केले आहे. परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुजफ्फराबाद, पोंजाकसह इतर भागांत शांतातमय आंदोलन सुरु होते. पण नागरिकांवर पाकिस्तानी रेंजर्स आणि लष्कराने थेट गोळीबार केला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
या गोळीबारात आठहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या आंदोलना नेतृत्त्व संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) करत आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, गेल्या ७० वर्षांपासून लष्कर आणि सरकारने जनतेच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना दूर ठेवले आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांनी सेल्फ-रुल चार्टर ऑफ डिंमाड्स’ कायदा अमलात आणण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान सरकार व लष्करा त्यांच्यावर दडपशाहीच गाजवत आहे.
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
गेल्या तीन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरु असून बाजापेठा दुकाने वाहतूक पूर्णपण बंद आहे. पाकिस्तानी सैन्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शहरांमध्ये प्लॅग मार्च, पंजाब व इस्लामाबादमध्ये हजारो अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. तसेच इटंरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.परंतु आंदोलकांनी माघार घेतलेली नाही.
#WATCH | Pakistani Rangers opened fire on peaceful protesters in Muzaffarabad and other parts of PoJK who were demanding the Self-Rule Charter of Demands. Sources report over half a dozen casualties and several serious injuries in the past three days. (Video source: Local… pic.twitter.com/leZMYhRukT — ANI (@ANI) October 1, 2025
यामुळे लोकांनी पोलिसांनावर हल्ला करुन मुजफ्फरबादकडे मोर्चा वळवला आहे. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान रेंजराच्या गोळीबाराला जबाबदार धरत मुतांच्या कुटुंबाना तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच लोकांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही मागणी करण्यात आली आहे. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांमा सोडण्याचीही मागणी करत आहेत. याशिवाय ISI समर्थित मुस्लिम कॉन्फरन्सला दहशतवादी संघटाना घोषित करण्यास सांगितले आहे.
प्रश्न १. पीओकेमध्ये आंदोलन का सुरु आहे?
पीओकेच्या लोकांनी आरोप केला आहे गेल्या ७० वर्षांपासून त्यांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे आपले अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन सुरु आहे.
प्रश्न २. या आंदोलनात किती जीवितहानी झाली आहे?
पाकिस्तानी रेंजरच्या आणि सैन्याच्या गोळीबारात आंदोलनात ८ हून अधिक लोकांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
प्रश्न ३. काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या?
आंदोलनकर्त्यांनी मृतांच्या कुटुंबाना आर्थिक मदत व सरकारी नोकऱ्या, आंदलोकांची सुटका, ISI समर्थित मुस्लिम कॉन्फरन्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे, तसेच पीओके विधानासभेत सुधारणा अशा मागण्या केल्या आहेत.