
Denmark
Denmark will not hand over Greenland even if the USA threatens us with nuclear weapons. I am not saying this to stump our chest and try to be tough. We are small and no match for the USA. We know that. But we are not doing it under any circumstances. — Rasmus Jarlov (@RasmusJarlov) January 10, 2026
रास्मस जारलोव यांनी म्हटले आहे की, कोणत्याही देशाने सैन्यबळाचा किंवा दबावाचा वापर करुन दुसऱ्या देशावर ताबा मिळवणे हे अत्यंत धोकादायक आहे. भारताने देखील अशा प्रयत्नाला कधी मान्यता दिली नाही. यामुळे भारताने डेन्मार्कच्या बाजूने उभे रहावे अशी मागणी रास्मस जारलोव यांनी केली आहे.
ग्रीनलँड भारतापासून खूप दूर आहे, पण येथे काही महत्त्वाची तत्त्वे धोक्यात असल्याचे रास्मस जारलोव यांनी म्हटले. त्यांनी भारताच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत संपूर्ण जागासाठी हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील भूमिकेवर टीका करत त्यांनी चीन किंवा रशियाकडून त्यांना कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
व्हेनेझुएलातील कारवाईनंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर निशाणा साधला होता. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ग्रीनलँड अमेरिकेसाठी गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, ग्रीनलँडने शांततेने सहमत असेल तर ठीक, अन्यथा अमेरिका जबरदस्तीने बेटावर ताब्यात घेईल. सध्या ट्रम्प यांच्या या धमकीला डेन्मार्कमधून तीव्र विरोध केला जात आहे.
ग्रीनलँडवर सार्वभौमत्त्वाचा दावा अमेरिका करु शकत नाही असे रास्मस जारलोव यांनी म्हटले आहे. व्हेनेझुएलाचा संदर्भ देत जारलोव यांनी म्हटले की, व्हेनेझुएलाकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता, पण तरीही ट्रम्प यांनी ड्रग्जचा मुद्दा उठवत त्यांच्यावर धावा केला. ग्रीनलँडबाबतही ट्रम्प असेच करत आहे. त्यांना ग्रीनलँकडून कोणताही धोका नसताना ते आम्हाला धमकी देत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरु शकतो असे जारलोव यांनी म्हटले.
‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा