India is developing hypersonic weapons to boost defense self-reliance
India hypersonic missile test : भारत आता पारंपरिक संरक्षणाच्या चौकटीत अडकून राहिलेला देश राहिलेला नाही. हायपरसोनिक शस्त्रांच्या क्षेत्रात देशाने जी झेप घेतली आहे, ती पाहता आता भारत महासत्ता देशांशी खांद्याला खांदा लावून उभा राहतो आहे. डीआरडीओकडून विकसित होणारी पाच महत्त्वाची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे HSTDV, ब्रह्मोस-II, SFDR, शौर्य आणि HGV—या भारताच्या सामरिक सामर्थ्याचा नवा चेहरा दर्शवत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान कितीही मोठे दावे करत असला, तरी ही शस्त्रे पाहता त्याची घबराट वाढलेली स्पष्ट दिसते.
हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) हे डीआरडीओचे अभूतपूर्व संशोधन आहे. स्क्रॅमजेट इंजिनवर आधारित हे व्हेईकल हवेतून ऑक्सिजन घेत उड्डाण करते. यामुळे इंधन कमी लागते आणि वेग मॅक ६ (ध्वनीच्या वेगाचा ६ पट) पर्यंत पोहोचतो. २०२० मध्ये यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता ते हायपरसोनिक क्षेपणास्त्रात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. २०२६ पर्यंत भारताचे पहिले स्वदेशी हायपरसोनिक क्षेपणास्त्र सेवा देण्यास तयार होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गिझा पिरॅमिड्स प्रत्यक्षात कोणी बांधले? शास्त्रज्ञांनी नवीन शोधात केले आहेत मोठे दावे
जगप्रसिद्ध ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा हायपरसोनिक अवतार म्हणजे ब्रह्मोस-II. रशियाच्या सहकार्याने विकसित होणारे हे क्षेपणास्त्र मॅक ७ पर्यंत वेग गाठण्यास सक्षम असेल. जमीन, समुद्र व आकाशातून प्रक्षेपण होऊ शकणारे हे घातक अस्त्र २०२६ मध्ये चाचणीस तयार होईल.
सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (SFDR) हे तंत्रज्ञान भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात क्रांती घडवून आणणारे आहे. मॅक ४.५ ते ६ पर्यंत वेग गाठणाऱ्या या प्रणालीमुळे लांब पल्ल्याच्या ‘एअर टू एअर’ क्षेपणास्त्रांना प्रचंड ताकद मिळणार आहे. २०१८ पासून अनेक चाचण्या यशस्वी ठरल्या असून २०२५-२६ पर्यंत हे शस्त्र प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
शौर्य हे कॅनिस्टर बेस्ड क्षेपणास्त्र आहे, जे जमिनीवरून प्रक्षेपित केले जाते आणि वातावरणाच्या उच्च थरात झेपावते. त्याचा मॅक ७.५ चा वेग आणि अप्रत्याशित मार्गामुळे शत्रूला ते रोखणे कठीण होते. सध्या लष्करात मर्यादित प्रमाणात वापर होत असला, तरी हायपरसोनिक आवृत्ती आणखी घातक असेल.
हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) हा सर्वात कमी चर्चेत असलेला पण अत्यंत धोकादायक प्रकल्प आहे. हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रातून प्रक्षेपित होऊन मॅक १० पेक्षा अधिक वेगाने झेपावते. २०२८-३० दरम्यान याचे प्रत्यक्ष शस्त्र रूपांतरण होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली यशस्वी ठरल्यास भारत अमेरिका आणि चीनच्या पातळीवर पोहोचेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताविरुद्ध मोठे षड्यंत्र! पाकिस्तानचे ‘या’ देशाला भेटणे धोकादायक; CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले कारण
डीआरडीओचे वार्षिक बजेट ₹२३,०००-₹२५,००० कोटींपैकी जवळपास ₹५,००० कोटी हायपरसोनिक प्रकल्पांसाठी वापरले जात आहेत. यावरून स्पष्ट होते की भारत आता केवळ खरेदीदार नव्हे, तर जागतिक पातळीवर स्वावलंबी संरक्षण उत्पादक बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे.
भारताची ही पाच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे केवळ शस्त्र नाहीत, तर शत्रूंना मनोवैज्ञानिकदृष्ट्या हादरवणारी सामरिक रणनीती आहेत. पाकिस्तान असो की इतर महासत्ता, आता भारत ‘प्रतिक्रिया देणारा’ नाही, तर ‘पुढाकार घेणारा’ देश बनला आहे.