Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Talks : चर्चेआड अमेरिकेचा ‘डबल गेम’? ट्रम्प यांचा इराणच्या तेल निर्यातीवर मोठा प्रहार; खामेनेईंना झटका

US Sanctions on Iran Oil : ओमानमधील चर्चेनंतर ट्रम्प यांनी इराणला मोठा झटका दिला आहे. इराणच्या तेल आयातींलवर अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहे. यामुळे अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 10:26 AM
US Iran Nuclear Talks

US Iran Nuclear Talks

Follow Us
Close
Follow Us:
  • ओमानमधील चर्चेनंतर अमेरिकेने इराणवर लादले निर्बंध
  • तेल आयातीवरील नव्या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था आणखी कमकुवत होणार
  • जागतिक तेलदरही वाढण्याची शक्यता
US Sanctions on Iran Oil : वॉशिंग्टन/तेहरान : इराणच्या तेल निर्यातीवर पुन्हा एकदा अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहे. ओमानमधील झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेनंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. परंतु अमेरिकेचा हेतू इराणच्या अणु कार्यक्रमाला रोखण्याचा असल्याचे वॉशिंग्टनने म्हटले आहे.

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी! मध्यपूर्वेतील ‘हा’ अरब देशही बनवतोय अण्वस्त्र, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मोठा खुलासा

इराणची तेल आयात रोखण्याचा ट्रम्प यांचा उद्देश

अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील व्हाइट हाउसने जारी केलेल्या निवदेनानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा हा निर्णय इराणवर दबाव वाढवून अणु कार्यक्रम रोखण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. अमेरिकेच्या मते, तेल आयातीच्या उत्पन्नातून इराणच्या अणु कार्यक्रमाला चालना मिळत आहे.

परंतु ही तेल आयात रोखल्यास इराण अणु कार्यक्रम थांबवण्यास भाग पडेल असे ट्रम्प यांचे मत आहे. मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे इराणच्या राजकीय वर्तुळात नाराजी निर्माण झाली आहे. तसेच यामुळे अनेकजण आश्चर्यातही आहेत.

जहाजे, कंपन्या अन्…

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेदिलेल्या माहितीनुसार, या नव्या निर्बंधामध्ये इराणची १४ जहाजे. १५ कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या जहाजांद्वारे भारत, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती जहाजांचाही समावेश आहे. अमेरिकेने या जहाजांनी इराणी तेलाची बेकादेशीर वाहतूक केल्याचा आरोप केला आहे.

तसेच इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांनाही कडक इशारा देण्यात आला आहे. निर्बंध लादलेल्या कंपन्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण या कंपन्यांशी कोणताही व्यापार अमेरिकन कायद्यानुसार बेकायदेशीर आणि दंडनीय मानला जाईल असे सांगण्यात आले आहे.

चर्चांदरम्यान इराणला झटका

अमेरिकेने हा निर्णय आशा वेळी घेतला आहे, जेव्हा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ओमानमधील अणु चर्चा यशस्वी झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी दोन्ही देशातील तणाव कमी होईल असाही इशारा दिला होता. परंतु अमेरिका केवळ चर्चांवर अवलंबून राहणार नसून दबावाचे धोरणे सुरुच ठेवेल हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या मते अमेरिका दुहेरी खेळ खेळच आहे. इराणला आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरु आहे.

जागतिक स्तरावरील परिणाम

सध्या इराण मोठ्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थीत नव्या निर्बंधामुळे इराण आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक व्यापाराहीवरही परिणाम होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे भविष्यात तेलाच्या किमतींवर परिणाम होईल.

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध का लावले आहेत?

    Ans: अमेरिकेच्या मते, तेल उत्पादनातून इराणच्या अणुकार्यक्रमाला निधी मिळत आहे, यामुळे जागतिक अस्थिरता वाढत चालली असल्याने तेल निर्यात रोखण्यासाठी नवे निर्बंध लादण्यात आले आहेत.

  • Que: अमेरिकेने कशावर निर्बंध लादले आहेत?

    Ans: अमेरिकेने इराणची तेल निर्यात करणारी १४ जहाजे, १५ तेल कंपन्या आणि २ व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.

  • Que: अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधाचा जागतिक स्तरावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेच्या इराणवरील नव्या निर्बंधामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक तेल किंमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Us imposes sacntions on iran oil sector after oman nuclear talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Nuclear missiles
  • World news

संबंधित बातम्या

US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर
1

US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर

IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO
2

IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO

Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन
3

Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन

Congo Massacre : काँगोमध्ये माणुसकी हरपली! ISIS संबंधित बंडखोरांचा 56 जणांना मृत्यूचा फास; गावच्या गाव राख
4

Congo Massacre : काँगोमध्ये माणुसकी हरपली! ISIS संबंधित बंडखोरांचा 56 जणांना मृत्यूचा फास; गावच्या गाव राख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.