India-Pakistan Tension Former Pakistani PM Sharif had planned to attack India claim by pakistan minister ajma bukhari
इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर या मोहीमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान चवथाळला होता. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये पाकिस्तानला पराभव मिळाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले आणि त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान १० मे रोजी दोन्ही देशांनी युद्धंबंदीवर चर्चा करुन शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच आहे. पाकिस्तान भारताच्या कडक कारवाईने देखील सुधारलेला नाही. दरम्यान पाकिस्तानकडून भारताला सिंधू जल करारावरुन धमक्या दिल्या जात आहे.
याच वेळी पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलास्याने मोठी खळबळ उडाली आहे. दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताविरुद्धच्या हल्ल्याचा कट रचला होता.
सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या एका वरिष्ठ नेत्यांना हा खुलासा केला आहे. पंजाब प्रांताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अजमा बुखारी यांनी बुधवारी (१४ मे) पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखाली भारताविरुद्धच्या हल्ल्याची योजना आखण्यात आली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, नवाज शरीफ फक्त बोलत नाहीत, तर करुन दाखवतात.
मंत्री अजमा बुखारी यांनी दावा केला आहे की, नवाज शरीफ यांनीच पाकिस्तानला अण्वस्त्रधारी देश बनवले आहे. नवाज यांनी भारताविरोधात संपूर्ण योजनेचा कट रचला आहे. नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी तीन वेळा निवडून आले होते. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. तसेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. यामुळे भारताविरुद्धच्या हल्ल्यात त्यांची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २८ निरापराधांचा वळी गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोही राबवत पहलगामचा बदला घेतला. भारताने या मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमदील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. स्वत:ला दहशतवादाचा बळी समजून घेणाऱ्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधले आणि त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ला केला. परंतु बारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यासला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे अनेक लष्कीर तळे उद्ध्वस्त केली.