भारताच्या हल्ल्यानंतर दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातून गायब; ठार की फरार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त करुन टाकले. यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद बद्दल अद्याप कोणताही सुगावा लागेलाला नाही. यामुळे सईद हल्ल्यात ठार झाला की फरारा असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी याबाबत मोठा विधान केले आहे.
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की सध्या पाकिस्तानंमध्ये एकही दहशतवादी नाही. दरम्यान त्यांच्या या विधाननंतर दहशतवादी हाफिज सईद बद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हाफिज सईद पाकिस्तानमधून नक्की पळाला कुठे? की भारताच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
यापूर्वी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आसिफ ख्वाजा यांनी म्हटले की, १९८० च्या दहशतकात पाकिस्तानने अमेरिका आणि ब्रिटनसाठी दहशतवाद्यांना प्रोत्यासहन दिले होते. मात्र सध्या पाकिस्तानच्या भूमीवर एकही दहशतवादी नाही. ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि अमेरिका त्यांच्या सोयीनुसार, दहशतवाद्यांची व्याख्या करतात. अफगाणिस्तानचे गृहमंत्री पूर्वी दहशतवादी होते, पण नंतर त्यांना मौलवी बनवण्यात आले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांच्या विधानानंतर दहशतवादी हाफिज सईदबद्दल तीन प्रश्न उपस्थित झाले आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिजची दहशवादी संघनाच लष्कर-ए-तैयबाचा हात होता. यामुळे काही प्रश्न तज्ज्ञांनकडून उपस्थित करण्यात आले आहे.
१. पहिला प्रश्न म्हणजे ७ मे रोजी भारताने हाफिज सईदच्या मुरीदकेवर हल्ला केला होता. यानंतर येथे अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त समोर आले. परंतु हाफिज बद्दल कोणतीही पुष्टी झाली नाही. दरम्यान पाकिस्तान सरकराने देखील याबद्द कोणती माहिती उघड केलेली नाही, की हल्ल्यात मारले गेलेले लोक नेमकं कोण होते?
२. दुसरा प्रश्न असा की, काही दिवसांपूर्वीच हाफिज सईच्या मुलाने त्याचे वडिल सुरक्षित असल्याचे म्हटवले होते. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, पाकिस्तानच्या भूमीवरुन हाफिज कुठे गायब झाला. हाफिज पाकिस्तानसोडून अफगाणिस्तानमध्ये लपून बसला असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणताही ठोस पुरवा मिळालेला नाही.
३. आता तिसरा प्रश्न म्हणजे, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी केलेले हे विधान की पाकिस्तानच्या भूमीवर एकही दहशतवादी नाही. हे विधान केवळ भारताकडून कारवाई टाळण्यासाठी तर करण्यात आलेले नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये पोसलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही काळात भारत यासंबंधीचे पुरावे जगासमोर सादर करणार आहे. तसेच सध्या दहशतवादी हाफिज सईद नक्की मारला गेला की कुठे लपून बसला आहे, याचा शोध सुरु आहे.