India-Pakistan War Pakistan's Deputy Prime Minister Ishaq Dar say we are ready to retreat if India Stops
इस्लामाबाद: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. या हल्ल्यात 28 निरापराध बळी गेलेल्या लोकांचा न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहीम स्थापन केली. या मोहीमेअंतर्गत भारताच्या लष्कर, नौदल, हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या मध्ये जैश-ए-मोहम्मद, आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादाच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करुन टाकण्यात आले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. तथापि, भारताने मजबूत संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे बहुतेक हल्ले हाणून पाडले आहेत.
दरम्यान भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरलेला आहे. याच वेळी पाकिस्तानेच उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशार दार यांचे मोठे विधान समोर आले आहे. इशाक दार यांनी पाकिस्तानला युद्ध नको असून शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दार यांनी म्हटले आहे की, जर भारताने पाकिस्तानवरी हल्ले थांबवले तर, आम्हीही मागे हटण्यास तयार आहोत.
इशाक दार यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी आहे. भारताने आमच्यावरील हल्ले थांबवले तर, आम्हीही कोणतेही प्रत्युत्तर देणार नाही, किंवा कोणतीही कारवाई करणार नाही. आम्हाल खरंच शांतता हवी आहे. पाकिस्तानचे ध्येय विनाश थांबवणे आहे. दरम्यान पाकिस्तानने विविध देशांशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्च केली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशातील तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची असल्याचे म्हटले.
दरम्यान पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर ला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन बुन्यानू-उन मुर्सुस सुरु केले आहे. परंतु भारताने हे ऑपरेशन काही तासांतच हाणून पाडले आहे. पाकिस्तानने, भारताच्या उधमपूर, पठाणकोट, भटिंडा, आणि भूजमधील हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. यासाठी पाकिस्तानने ड्रोन आणि विशेष क्षेपणास्त्रांचा वापर केला. परंतु भारताने हे हल्ले धूडकाऊन लावले आहेत.या हल्ल्यांना प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानच्या रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कूर आणि चूनिया एअरबेससह पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत.
भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचे गंभीर नुकसान झाले आहे. परंतु भारताने हे स्पष्ट केले आहे की, हल्ल्यात सामान्य नागरिकांचे नुकसाना होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भारताच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या कमांकॉड ॲंड कंट्रोल सेंटर्स, रडार साईट्स, शस्त्रास्त्रांचा साठा पूर्णपणे नष्ट केला आहे.