Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही…’; होर्मुजमधील युद्धनौकांच्या तैनातीवर भारताने Donald Trump यांना दिले स्पष्ट उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजमध्ये युद्धनौका पाठवण्याचे केलेल्या आवाहनावर भारताने स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेशी कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 16, 2026 | 08:26 PM
होर्मुजमधील युद्धनौकांच्या तैनातीवर भारताने Donald Trump यांना दिले स्पष्ट उत्तर (Photo Credit- X)

होर्मुजमधील युद्धनौकांच्या तैनातीवर भारताने Donald Trump यांना दिले स्पष्ट उत्तर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • होर्मुजमधील तणाव
  • भारताने अमेरिकेचा दावा फेटाळला
  • युद्धनौका पाठवण्यावर चर्चा नाही
India Response to Donald Trump Hormuz Strait Warship Deployment: इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Hormuz Strait) या जागतिक इंधन पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासह अनेक देशांना आपल्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भारताने या मुद्द्यावर अमेरिकेशी कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘टूथ सोशल’वरील आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘टूथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी कृत्रिमरित्या बंद करण्याचे प्रयत्न सुरू असून, याचा फटका चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडमसह भारतालाही बसत असल्याचे त्यांनी म्हटले होते. हा जलमार्ग सुरक्षित आणि खुला ठेवण्यासाठी या सर्व देशांनी आपापल्या युद्धनौका होर्मुजमध्ये तैनात कराव्यात, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते.

परराष्ट्र मंत्रालयाची अधिकृत भूमिका

ट्रम्प यांच्या विधानानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माध्यमांना माहिती दिली. “होर्मुज सामुद्रधुनीतील परिस्थितीबाबत अनेक देशांमध्ये चर्चा सुरू आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, या विषयावर भारताने अमेरिकेशी द्विपक्षीय स्तरावर अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही,” असे जायसवाल यांनी स्पष्ट केले.

इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?

हितधारकांशी चर्चा सुरू राहणार

भारत या संवेदनशील मुद्द्यावर जागतिक स्तरावरील विविध हितधारकांशी संवाद साधत आहे. भारतीय जहाजांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून, त्यादृष्टीने विविध देशांशी चर्चा सुरू राहील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, अमेरिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन युद्धनौका पाठवण्याबाबत भारताने सध्या कोणतीही वचनबद्धता दर्शवलेली नाही.

इंधन संकटाचे जागतिक सावट

इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून होर्मुजमधून होणारी जहाजांची वाहतूक रोखून धरली आहे. तसेच जहाजांवर हल्ले करण्याची धमकी दिल्याने जागतिक शिपिंग वाहतुकीत मोठी घट झाली आहे. यामुळे जगभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, इराणने भारतासह काही मित्र देशांच्या जहाजांना सुरक्षित प्रवासाचे आश्वासन दिले असून, त्यामुळे काही प्रमाणात भारतीय जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे.

५४ हजार टन गॅसचा साठा भारतात दाखल

युद्धजन्य परिस्थितीमध्येही भारताचे ‘शिवालिक’ हे जहाज 54 हजार टन एलपीजी साठा घेऊन गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचले आहे. हे जहाज आल्याने गॅस वितरणातील अडथळे दूर होतील. तसेच, ‘नंदा’ हे दुसरे जहाजही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन मोठ्या खेपांमुळे देशातील एलपीजीचा तुटवडा दूर होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

Iran- Istrayal War : उद्योजकांनी दुबई सोडली; उरले फक्त कामगार, इराणच्या हल्ल्यांमुळे दुबईची दैना

Web Title: India response to donald trump hormuz strait warship deployment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.