Russia hopes to develop cooperation with India in multiple areas says Foreign Ministry
मॉस्को: गेल्या अनेक काळापासून रशिया आणि भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्रीही चांगली आहे. लवकरच पंतप्रधान मोदी रशियाच्या विजय परेड दिनात सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी (13 एप्रिल 2025) रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्वपूर्ण विधान केले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतासोबत भविष्यातही मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट आणि विस्तारीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच नवी दिल्लीसोबत बहुआयामी सहकार्य वाढवण्यावरही आशा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय राजनैतिक संबंधाच्या 78 व्या वर्धाप दिनानिमित्त रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “मैत्रीपूर्ण संबंधांच्या जलद गतीने सुरू असलेल्या विकासावर आणि रशियन-भारतीय संबंधांच्या विस्तारावर आम्ही विश्वास व्यक्त करतो.”
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियामध्ये 13 एप्रिल 1947 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध विश्वासार्हता, उच्च पातळीवरील राजकीय संवाद आणि विशेषतः विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीवर अवलंबून आहे. दोन्ही देश परस्पर विश्वास, राष्ट्रीय हितसंबंधांचा आदर, जागतिक आणि प्रादेशिक राजकारणाच्या पैलूंवर समान विचार करतात असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाने हेही म्हटले की, दोन्ही देशांत आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी नेहमी बैठका होतात. या बैठकांमधून संबंध अधिक दृढ झाले आहेत. सांस्कृतिक, मानवतावादी, व्यापार आणि आर्थिक सहकार्य दोन्ही देशामध्ये विकसित होत आहे. तसेच अणु उर्जेचे क्षेत्र दोन्ही देशांतील संबंध वळकट करम्यासाठी अधिक महत्वपूर्ण ठरले आहे. रशिया आणि भारतातील संबंध जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीसाठी समानता, आंतरराष्ट्रीय कायदे आणि तत्वाचे पालन करण्यावर आधारित आहेत.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारतासोबतच्या विशेष धोरणात्मक भागीदारीला त्यांच्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्य म्हणून संबोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2024 मध्ये रशियाला भेट दिली होती, पाच वर्षांनंतर भेट देण्याची शक्यता आहे. या दरम्यान त्यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते आणि यावर्षी त्यांच्या भारत भेटीची अपेक्षा आहे. दरम्यान, रशियाने मोदींना 9 मे रोजी दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका-इराणमध्ये कराराचा भारताला काय फायदा होईल? वाचा सविस्तर