India–UK Sign Landmark Trade Deal
लंडन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली. दरम्यान दोन्ही नेत्यांच्या बैठकीत भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी केली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थिती या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला आणि गुंतणूकीला चालना मिळेल.
या कराराला ६ मे २००२५ रोजी अंतिम मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आज गुरुवारी २४ जुलै रोजी दोन्ही देशात या करारवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार २०३० पर्यंत १२ बिलियन पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे (FTA) दोन्ही देशातून आयात निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर कमी शुल्क (Tarrif) लादले जाईल.
#WATCH | London: India and UK sign the Comprehensive Economic and Trade Agreement.
(Video: ANI/DD News) pic.twitter.com/Qnrck6lDWb
— ANI (@ANI) July 24, 2025
भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या उपस्थिती करण्यात आला. भारताचे वाणिज्य विभागाचे मंत्री पियूष गोय आणि ब्रिटिश समकक्ष जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
ब्रिटनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. २५ ते २६ जुलै दरम्यान हा दौरा असेल. हा दौरा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुन होत आहे. हा पंतप्रधान मोदींचा मालदीवचा तिसरा दौरा आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार आहे.