Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India at UN : ‘भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला भीक नाही घालत…’, जिनिव्हा परिषदेत भारताची ठाम भूमिका

India at UN : भारतीय मुत्सद्दी बेदी म्हणाल्या, 'आम्ही मागणी करतो की, भारतातील ज्या भागात बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे, तो रिकामा करून परत करावा.' ते म्हणाले, 'भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे आणि सर्वांसोबत शांतता राखू इच्छितो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 10, 2026 | 12:43 PM
India UN Pakistan nuclear threat Anmol Sher Singh Bedi UN speech

India UN Pakistan nuclear threat Anmol Sher Singh Bedi UN speech

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या आण्विक धमकीला सडेतोड उत्तर
  • अण्वस्त्रांचा गैरवापर थांबवण्याची मागणी
  • बेकायदेशीर कब्जा रिकामा करण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय स्तरावर (India at UN ) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना अत्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे. “भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला कधीही घाबरणार नाही,” असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूतांनी पाकिस्तानच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर जोरदार टीका करत स्पष्ट केले आहे. शुक्रवारी, भारताने संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या समितीच्या बैठकीत पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी आपल्या ‘प्रत्युत्तराच्या अधिकाराचा’ (Right of Reply) खुबीने वापर केला. भारताने यावर तीव्र शब्दांत जोर दिला की, नवी दिल्ली कोणत्याही अणुबॉम्बच्या किंवा युद्धाच्या धमक्यांना बळी पडणार नाही आणि देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम आहे.

अणुबॉम्बच्या धमक्यांना थारा नाही

निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावर जिनिव्हा येथील निःशस्त्रीकरण परिषदेत भारताची बाजू मांडताना, भारताच्या स्थायी मिशनमधील वरिष्ठ सल्लागार (निःशस्त्रीकरण) अनमोल शेर सिंग बेदी यांनी भारताची भूमिका जगासमोर खमक्यापणे ठेवली. त्यांनी स्पष्ट केले की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा नेहमीच अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. भारताला कधीही अनावश्यक संघर्ष किंवा युद्ध नको आहे, परंतु सीमापार सुरू असलेल्या बेजबाबदार कृती आणि दहशतवादाला पाठीशी घालण्याच्या प्रवृत्तीमुळे या संपूर्ण प्रदेशातील संकट अधिक गंभीर होत चालले आहे, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा

अण्वस्त्रांचा वापर म्हणजे तणाव वाढवण्याचे षड्यंत्र

भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर हा मुद्दा ठामपणे मांडला की, अण्वस्त्रांकडे शासनाचे किंवा कोणालाही ब्लॅकमेल करण्याचे सोपे साधन म्हणून पाहू नये. बेदी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचा समाचार घेत म्हटले, “दहशतवादी कारवाया आणि अप्रत्यक्ष कृत्यांचे परिणाम लपवण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी अणुबॉम्बच्या धमक्यांचा वापर करणारा दृष्टिकोन हा तणाव कमी करण्याची कोणतीही शक्यता निर्माण करत नाही, तर यामुळे उलट संपूर्ण दक्षिण आशियातील तणाव वाढण्याचा धोका कैक पटीने वाढतो.”

भारताने हे जगाला पुन्हा एकदा आठवण करून दिली की, भारताची लष्करी क्षमता आणि धोरण हे पूर्णपणे बचावात्मक (Defensive) हेतूंसाठी तयार करण्यात आले आहे आणि ते कोणत्याही शांतताप्रिय देशाच्या विरोधात नाही. परंतु, जर सीमापार होणाऱ्या दहशतवादी हालचाली आणि चिथावणीखोर कृत्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही, तर शांतता ही केवळ दोन युद्धे किंवा संकटांमधील एक तात्पुरती शांतता ठरेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की, अण्वस्त्रांचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी करण्याचे प्रकार आता थांबलेच पाहिजेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

बेकायदेशीर कब्जा तातडीने रिकामा करण्याची मागणी

या उच्चस्तरीय बैठकीत भारताने आणखी एक महत्त्वाची आणि रोखठोक मागणी केली. भारताने स्पष्ट केले की, “आम्ही मागणी करतो की, भारतातील ज्या भागावर बेकायदेशीरपणे ताबा किंवा कब्जा करण्यात आला आहे, तो प्रदेश पाकिस्तानने लवकरात लवकर रिकामा करून भारताला परत करावा.” भारत हा नेहमीच जागतिक शांततेच्या बाजूने राहिला आहे आणि सर्वांसोबत सलोख्याचे व शांततेचे संबंध राखू इच्छितो, परंतु याचा अर्थ असा नाही की भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले जाईल आणि देश गप्प राहील.

भारताच्या या कणखर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. आजच्या आधुनिक आणि शांतताप्रिय जगात दहशतवादाला आणि आण्विक ब्लॅकमेलिंगला पाठीशी घालणाऱ्या देशांना जागतिक मंचावर स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, भारत सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही आणि प्रत्येक आव्हानाला चोख उत्तर देईल.

Web Title: India un response pakistan nuclear blackmail jammu kashmir disarmament hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • United Nations Security Council
  • World news

संबंधित बातम्या

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?
1

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?

Iraq News : इराकच्या बसरामध्ये वीज केंद्राला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी आणि ज्वाला थेट घरांपर्यंत पोहोचल्या
2

Iraq News : इराकच्या बसरामध्ये वीज केंद्राला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी आणि ज्वाला थेट घरांपर्यंत पोहोचल्या

Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर; ताजमहल पाहण्याची दिली परवानगी पण…
3

Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर; ताजमहल पाहण्याची दिली परवानगी पण…

SCO Forum : ‘दहशतवादावर मौन, बहुपक्षीय मुद्द्यांवर भर…’; पाकिस्तानी मंत्र्याने दिल्लीत खेळला नवा डाव, वाचा नेमकं काय घडलं?
4

SCO Forum : ‘दहशतवादावर मौन, बहुपक्षीय मुद्द्यांवर भर…’; पाकिस्तानी मंत्र्याने दिल्लीत खेळला नवा डाव, वाचा नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.