Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Affairs: UN मध्ये भारताची गुगली! इराणविरोधी ठरावावर ‘No’ म्हणत पाश्चात्य देशांना दिले राजनैतिक पण कठोर प्रत्युत्तर

UN Human Rights Vote: संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाश्चात्य देशांच्या इराणविरुद्धच्या ठरावाला विरोध करून भारताने 'नाही' असे मतदान करून आपले स्वतंत्र आणि मजबूत परराष्ट्र धोरण दाखवून दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 24, 2026 | 12:29 PM
india votes against iran human rights resolution unhrc january 2026 news

india votes against iran human rights resolution unhrc january 2026 news

Follow Us
Close
Follow Us:
  • पाश्चात्यांना भारताचा ‘दे धक्का’
  • स्वायत्त परराष्ट्र धोरण
  • इराणमधील हिंसाचार

India votes against Iran resolution UNHRC 2026 : जागतिक राजकारणात भारताने पुन्हा एकदा आपले ‘स्वतंत्र आणि सार्वभौम’ परराष्ट्र धोरण सिद्ध केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) एका विशेष अधिवेशनात, पाश्चात्य देशांनी इराणमधील (Iran) मानवी हक्क उल्लंघनाविरुद्ध आणलेल्या ठरावावर भारताने विरोधात म्हणजेच ‘नाही’ (No) असे मतदान केले. भारताच्या या एका निर्णयामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांची इराणची कोंडी करण्याची रणनीती पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही.

नेमका वाद काय आहे?

२८ डिसेंबर २०२५ रोजी इराणमध्ये महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि चलनाचे अवमूल्यन यावरून जनआक्रोश उसळला होता. या निदर्शनांदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि आइसलँड यांसारख्या देशांनी इराणविरुद्ध ‘स्वतंत्र चौकशी’ करण्याचा ठराव मांडला होता. २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या मतदानात भारताने पाश्चात्य देशांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : शांतीदूत की युद्धदूत? नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’; क्युबा-निकाराग्वा निशाण्यावर

भारताची भूमिका: अंतर्गत बाबींत हस्तक्षेप नको!

भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, कोणत्याही देशाच्या अंतर्गत वादात बाह्य शक्तींनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. भारताने नेहमीच ‘देश-विशिष्ट’ (Country-specific) मानवाधिकार ठरावांना विरोध केला आहे. २२ जानेवारीला झालेल्या प्राथमिक चर्चेतच भारताने आपले संकेत दिले होते. भारताचा असा विश्वास आहे की, इराण हे एक सार्वभौम राष्ट्र असून ते आपले प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे.

Just in: India votes NO on west backed UN Human Rights Council’s resolution which expressed ‘concerns’ over protest in Iran. pic.twitter.com/7ZCUdXacH3 — Sidhant Sibal (@sidhant) January 23, 2026

credit – social media and Twitter

इराणशी असलेले धोरणात्मक संबंध (Strategic Ties)

भारताने इराणला दिलेला हा पाठिंबा केवळ मानवाधिकारापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे मोठे धोरणात्मक कारण आहे: १. चाबहार बंदर: अफगाणिस्तान आणि मध्य आशियासाठी भारताचे हे प्रवेशद्वार आहे. २. ऊर्जा सुरक्षा: भारत इराणकडून होणारी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात पुन्हा सुरळीत करण्याच्या तयारीत आहे. ३. प्रादेशिक संतुलन: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या प्रभावामुळे भारताला इराणच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan Election 2026: जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांचा मोठा जुगार; 3 महिन्यांतच संसद बरखास्त, 8 फेब्रुवारीला होणार मतदान

जागतिक मतदानाचे निकाल

या मतदानात भारतासोबत चीन आणि इतर ५ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. २४ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर १४ देशांनी मतदानात भाग न घेता ‘तटस्थ’ (Abstain) राहणे पसंत केले. यामुळे पाश्चात्य आघाडीला नैतिकदृष्ट्या हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भारताने यापूर्वीही महसा अमिनी निदर्शनांच्या वेळी (२०२२) इराणची साथ दिली होती. या ताज्या घडामोडींमुळे भारत आणि इराणमधील ‘मैत्रीचा पूल’ अधिक मजबूत झाला असून, जागतिक राजकारणात भारत कोणत्याही गटाचा भाग न बनता स्वतःचे हित जपतो, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने इराणविरुद्धच्या ठरावावर विरोधात मतदान का केले?

    Ans: भारताचे धोरण कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाच्या विरोधात आहे. तसेच इराणशी असलेले धोरणात्मक आणि ऊर्जा संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत.

  • Que: या ठरावाचा मुख्य विषय काय होता?

    Ans: डिसेंबर २०२५ पासून इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांवरील कारवाईची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी या ठरावात करण्यात आली होती.

  • Que: भारतासोबत आणखी कोणत्या देशांनी विरोध केला?

    Ans: भारतासह चीन आणि इतर ५ देशांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले, तर १४ देश तटस्थ राहिले.

Web Title: India votes against iran human rights resolution unhrc january 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • india
  • iran
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ दरम्यान उभे राहणे अनिवार्य; केंद्र सरकार राष्ट्रगीतासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाच्या तयारीत
1

‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ दरम्यान उभे राहणे अनिवार्य; केंद्र सरकार राष्ट्रगीतासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाच्या तयारीत

India-Bangladesh Rift: ‘आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!’ बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात
2

India-Bangladesh Rift: ‘आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!’ बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात

Mock Drill : ‘या’ जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजता होणार ब्लॅकऑट; सरकारची नेमकी काय आहे योजना?
3

Mock Drill : ‘या’ जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजता होणार ब्लॅकऑट; सरकारची नेमकी काय आहे योजना?

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप
4

भारत जगातील नंबर १ अर्थव्यवस्था बनणार? दावोसमध्ये अमेरिकन अब्जावधीशाच्या दाव्याने ट्रम्पची उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.