
indian origin man arrested in canada after gunfight in brumpton
मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री १०:४५ वाजता मॅकव्हीन ड्राइव्ह आणि कॅसलमोर रोडजवळ पार्किंग लॉटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये पार्किंगमध्ये हाणामारी सुरु होती, यावेळी अचानक एक व्यक्तीने बंदुक काढून दुसऱ्या गटातील व्यक्तीवर झाडली. या घटनेत पीडिताला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाअतंर्गत तीन भारतीय व्यक्तींना अटक केले आहे.
२० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांनी सर्च वॉरंट अंतर्गत कॅलेडॉनमधील एका घरावर छापा टाकला. यावेळी या व्यक्तींना अटक करण्यात आली. यामध्ये मनजोत भट्टी (वय २६) नवजोत भट्टी (वय २७) आणि अमनोजत भट्टी(वय २२) अशी या संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. तिघेही कॅलेडॉलमनचे रहिवासी आहेत.
धक्कादायक माहिती
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांमधील मनजोत भट्टीवर अनेक गंभीर आरोप आहे. त्याच्यावर जाणूनबुजून आणि बेपर्वाईने बंदुक चालवण्याचा, आणि धोकादायक शस्त्रे बाळगल्याचा आरोप आहे. मनजोतला ब्रॅम्प्टनमधील ओंटारिय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जामीन सुनावणी होईपर्यंत ताब्यात ठेवण्यात आले होते. शिवाय इतर दोन आरोपीं नवजोत आणि अमनजोत भट्टीवर देखील बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Tow Truck Rivalry Leading to Shooting: 3 Arrests, 1 Suspect Still Wanted 🚨 On October 7, an altercation between rival tow truck groups escalated into gunfire, leaving one person with minor injuries. After weeks of investigation, @PeelPolice have arrested three individuals, but… pic.twitter.com/xm9NQYKXM1 — Peel Regional Police (@PeelPolice) December 11, 2025
Ans: ब्रॅम्प्टनमध्ये ७ ऑक्टोबरच्या रात्री १०:४५ वाजता मॅकव्हीन ड्राइव्ह आणि कॅसलमोर रोडजवळ पार्किंग लॉटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती
Ans: ब्रॅम्प्टनमधील गोळीबार प्रकरणात मनजोत भट्टी (वय २६) नवजोत भट्टी (वय २७) आणि अमनोजत भट्टी(वय २२)अशा तीन भारतीय वंशाच्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
Ans: ब्रॅम्प्टनमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींवर बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याचा आणि आरोपी मनजोतवर जाणूनबुजून आणि बेपर्वाईने गोळीबारचा आरोप आहे.