
Zohran Mamdani wins New York City Mayor’s election
ममदानी ३३ वर्षांच असून न्यूयॉर्क राज्य विनाधसेचे सदस्य आहेत. ममदानी यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कचे नागरिकत्व मिळाले. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली आहे. यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश केला. ते न्ययूॉर्क शहरातील माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांच्याविरोधात महापौर पदाच्या निवडणूकीसाठी उभे राहिले होते. न्ययूॉर्कमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासिओ-कार्टेझ यांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.
ममदानी यांनी त्यांच्या विजयाचे वर्णन न्यूयॉर्कचा विजय म्हणून केला आहे. टॅक्सी चालकांपासून ते सर्व कामगार वर्गाचा विजय असल्याचे संबोधले आहे. तसेच त्यांनी त्यांचे विरोधक ॲंड्र्यू कुओमा यांचा उल्लेख करत, आम्ही एका राजकीय घराण्याचा पराभव केला असल्याचे म्हटले. त्यांनी ॲंड्र्यू कुओमा यांना वैयक्तिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, पण त्यांचे नाव शेवटच्या वेळी घेत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी असेही म्हटले की, जनतेने मला निवडणू एक चांगल्या बदलाचा संदेश दिला आहे. माझा विजय हा एकता, विश्वासाचा विजय आहे.
ममदानी यांचा विजय झाल्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी ममदानी उमेदवार बनल्याच्या सुरुवातीपासून त्यांना विरोध केला होता. ममदानी महापौर झाल्यास न्यू यॉर्कच्या निधीत कपात करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प, एलॉन मस्क यांसारख्या अनेक प्रमुख व्यक्तींनी ममदानी यांच्या विरोधक माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांना पाठिंबा दिला होता. सध्या अमेरिकेत ममदानी यांच्या विजयाने रिपब्लिकन पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे.
भारतीय वंशाच्या हाश्मी यांची गव्हर्नरपदी निवड
दुसरीकडे भारतीय वंशाच्या गजाला हाश्मी यांनी देखील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्या अमेरिकेच्या इतिहासात उच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहे. हाश्मी यांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड यांचा पराभव केला आहे.