भारतीय वंशाचे जोहरान ममदानी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या न्यूयॉर्कच्या २०२५च्या मेयरपदासाठी निवडणुका होणार आहे. यासाठी जोरदार लढत सुरु आहे.यासाठी भारतीय वंशांचे आणि मुस्लिम समाजातील जहरान ममदानी उमेदवारपदी आहेत. निवडणुक प्रचारासाठी त्यांनी एका अनेख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा सुरु आहे. सध्या त्यांना न्ययूॉर्कमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासिओ-कार्टेझ यांचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे.
तसेच त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील डायलॉगचा वापर करून मतदारांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एख व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “कोट्याधीशाकडे सर्व काही आहे… पण आता तुमचा वेळ येणार आहे.”
ममदानी ३३ वर्षांच असून न्यूयॉर्क राज्य विनाधसेचे सदस्य आहे. तसेच त्यांनी क्वीन्स जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. त्यांची आई मीरा नायर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांचे वडिल हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ममदानी यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कचे नागरिकत्व मिळाले. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली आहे. यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश केला.
ममदानी, न्ययूॉर्क शहरातील विद्यमान महापौर ॲंड्र्यू कुओमा यांना पराभूत कण्यासाछी उमेदवारीपदी उभे राहिले आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान अतिशय प्रगतशील आश्वासने दिली आहे. यामध्ये मोफत चाइल्ड केअर, मोफत बस सेवा, भाडेधारकांसाठी स्थिर भाडे, स्वस्त गृहनिर्माण आणि श्रीमंतांवर अधिर कर यांचा समावेश आहे. ममदानी यांनी यापूर्वी एक पायलट प्रकल्पाचे नेतृत्व केले होते. यामध्ये न्यूयॉर्क शहरातील बस सेवा मोफत करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावर विरोधकांकडून टीकांचा भडिमार सुरु आहे. ममदानी यांच्या योजना आशादायी आहेत. परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी, राज्य शासन आणि विधानमंडळाकडून मिळवणे कठीण आहे. ममदानी यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान आहे.
सध्या ममदानी केवळ निवडणुकीत जिंकण्यासाठी आणि प्रगतिशील मतदारांपुरते मर्यादित न राहता मध्यमवर्गीय व उदार विचारसरणीच्या मतहारांमध्ये त्यांच्या प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची मेयरम्हणून निवडणूक झाल्यास ते, न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय-अमेरिकन मेयर ठरतील.