Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप

Flydubai FZ1073 Iran Link : फ्लायदुबई FZ1073 घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याचे इराणने नाकारले असून, इराणी माध्यमांनी नेतान्याहू यांना जबाबदार धरले आहे, तर अमेरिका आणि इस्रायलमध्ये तपास सुरू आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 02, 2026 | 01:09 PM
Netanyahu Flydubai hijack conspiracy Captain Smit Muchhala Indian pilot

Netanyahu Flydubai hijack conspiracy Captain Smit Muchhala Indian pilot

Follow Us
Follow Us:
  • भारतीय वैमानिकाचे शौर्य
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
  • नेतान्याहूंवर इराणचा प्रत्यारोप

मध्य-पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय तणावाने आतापर्यंतचे सर्वात भयंकर रूप धारण केले असून, दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई FZ1073’ (Flydubai FZ1073) या प्रवाशांनी भरलेल्या विमानातील कथित दहशतवादी कटामुळे जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या विमानात १७४ प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते, ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायली नागरिकांचा समावेश होता. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही वेळातच कॉकपिटमध्ये घडलेल्या रक्तरंजित आणि नाट्यमय प्रसंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. या घटनेनंतर आता अमेरिका, इस्रायल आणि इराण हे तीन देश थेट आमनेसामने आले असून मध्य-पूर्वेत युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संपूर्ण जीवघेण्या प्रसंगात भारतीय वंशाचे मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी दाखवलेले असीम धैर्य आणि समयसूचकता सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. बुधवारी उड्डाण घेतल्यानंतर विमानातील ओमान वंशाच्या सह-वैमानिकाने अचानक मुख्य वैमानिक स्मित मच्छर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सह-वैमानिकाचा हेतू हे विमान कोसळवून मोठा अपघात घडवून आणण्याचा होता. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही कॅप्टन स्मित मच्छर यांनी हार मानली नाही. त्यांनी अत्यंत शिताफीने आणि साहसाने कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. कॉकपिटचा दरवाजा उघडताच विमानात असलेल्या सतर्क प्रवाशांनी तात्काळ कॉकपिटमध्ये धाव घेऊन हल्लेखोर सह-वैमानिकाला पकडले आणि त्याला सीटला बांधून ठेवले. यानंतर एका प्रवाशाच्या मदतीने जखमी स्मित मच्छर यांनी अत्यंत कौशल्याने हे विमान सौदी अरेबियाच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले आणि १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले.

या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात

दरम्यान, या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत तीव्रतेने उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेची गंभीर दखल घेत इराणला थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “आम्ही या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहोत. प्राथमिक माहितीनुसार यात इराणचा हात असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जर तपासात इराणचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाले, तर अमेरिका गप्प बसणार नाही. आम्ही तेहरानवर भीषण हल्ला करू आणि संपूर्ण इराण नष्ट करू.” ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा

या घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याचे…

दुसऱ्या बाजूला इराणने या घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत अमेरिका आणि इस्रायलचे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी ‘द प्रेस टीव्ही’ (Press TV) वर प्रसिद्ध झालेल्या अहवालात इराणी अधिकाऱ्यांनी एक खळबळजनक आणि विचित्र दावा केला आहे. इराणच्या दाव्यानुसार, फ्लायदुबई विमानातील अपहरणाचा हा कट खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीच रचला होता. इस्रायलमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नेतान्याहू यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची भीती वाटत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत नेतान्याहू यांच्या आघाडीला बहुमत मिळणे कठीण आहे. त्यामुळे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आणि अमेरिकेला इराणसोबतच्या नव्या युद्धात ओढण्यासाठी नेतान्याहूंनी हा पूर्वनियोजित कट आखल्याचा आरोप इराणने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस

ही घटना घडण्याच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेतान्याहू यांनी…

इराणने आपल्या दाव्यात पुढे असेही म्हटले आहे की, ही घटना घडण्याच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेतान्याहू यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांच्यासोबत इस्रायलचे अनेक वरिष्ठ लष्करी आणि गुप्तचर अधिकारी सहभागी झाले होते. याच दौऱ्यादरम्यान या कथित विमान अपहरणाच्या योजनेवर चर्चा करून ती अंतिम करण्यात आली होती, असा आरोप इराणने केला आहे. मात्र, इराणने आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. सध्या अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Indian pilot smit muchhala saves 174 passengers trump threatens iran hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Dubai
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
1

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा
2

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान
3

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
4

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.