
pm modi to visit ethiopia next week
मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष
इथिओपिया हे मोठे व्यापारी केंद्र असून भारताच्या ६५० हून अधिक कंपन्या तेथे कार्यरत आहेत. इथिओपियात या कंपन्यांनी ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आह. या दौऱ्याने आफ्रिकन खंडात भारताचे महत्त्व अधिक वाढणार आहे. इथिओपियाला आफ्रिकेचे हृदय म्हटले जाते, जो पूर्वेला जिबूती, पश्चिमेला सुदान आणि उत्तरेला एरिट्रिया आणि दक्षिणेला केनियाच्या सीमेजवळ आहे. एक एक मुस्लिम आणि ख्रिश्चन देश आहे.
भारत आणि इथिओपियातील राजनैतिक संबंध हे दीर्घकालीन आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारा गेल्या अनेक दशकांपासून भरभराटीला आला आहे. १९४१ मधअये इथिओपिया इटलीपासून मुक्त झाला तेव्हा भारताच्या सैन्याने यामध्ये महत्वाती भूमिका बजावली होती. भारताने १९४८ मध्ये इथिओपियात पहिला दूतावास स्थापन केले होते. दोन्ही देशांमध्ये हवाई सवा तंत्रज्ञान, आर्थिक आणि वैज्ञानिक सहकार्य, तसेच सूक्ष्म धरणे आणि लघुसिंचन प्रकल्पांमध्ये आधीपासूनच करार करण्यात आले आहेत. आता पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याने दोन्ही देशांच्या संबंधांनी अधिक बळकटी मिळणार आहे.
गेल्या काही काळापासून आफ्रिकन खंडात भारताचे महत्व अधिक वाढत आहे. भारताने आफ्रिकन खंडात आर्थिक, व्यापारी, गुंतवणूक, भू-राजकीय यांसारख्या क्षेत्रात प्रभाव वाढविण्यावर भर दिला आहे. भारत हा आफ्रिकन खंडातील तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दक्षिण-दक्षिण सहकार्य तत्त्वार आधिरत भारताने पायाभूत सुविधा, आरोग्य आणि क्षमता विकासासाठी आफ्रिकन खंडाला मदत पोहोचवण्याचे वचन दिले आहे. यामुळे जागितक शक्तींमध्ये यासाठी स्पर्धा निर्माण होत आहे.
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकन देश इथिओपियाच्या दौऱ्यावर पुढील आठवड्यात जाणार आहेत.
Ans: इथिओपिया आणि भारताचे २००० वर्ष जुने आहेत.