Indian student arrested in US accused of supporting hamas
वॉशिंग्टन: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यी बदर खान सुरी याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी व्हर्जिनिया येथून बदर खान सुरी याला हमासच्या समर्थनार्थ प्रचार केल्याच्या आरोपाखील अटक केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सध्या कारवाई सुरु आहे. यापूर्वी देखील अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. एका भारतीय विद्यार्थीने स्व-निवार्सन केले होते. तिच्यावरही हमासला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
हमासच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
परराष्ट्र धोरणार निषेधाच्या कारवाई अंतर्गत बदर खान सुरीलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर इस्त्रायलला विरोध केल्याचाही आरोप आहे. सुरी हा अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेत होता. मुस्लिम-ख्रिश्चन अंडरस्टॅंडिग येथे पोस्टडॉक्टरला फेलो म्हणून शिक्षण घेत होता. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे सहाय्यक सिचव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी, आरोप केला आहे की, सुरी हमासला सतत पाठिंबा देत होता. त्याने सोशल मीडियावर यहूदीविरोधी भावनांना प्रोत्साहन दिले. यामुळे त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात येते आहे.
हमासला पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय विद्यार्थीना व्हिसा रद्द
अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीला पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला असून, तिने स्वतःहून देश सोडला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या (डीएचएस) म्हणण्यानुसार, “हिंसाचार आणि दहशतवादाचे समर्थन” केल्याबद्दल रंजनी श्रीनिवासन यांचा व्हिसा ५ मार्च २०२५ रोजी रद्द करण्यात आला.
रंजनी श्रीनिवासन यांनी स्वतःहून देश सोडला
रंजनी श्रीनिवासन यांनी ११ मार्च रोजी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीपीबी) एजन्सीच्या ॲपचा वापर करून स्वतःहून देश सोडला. गृह सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “रंजनी श्रीनिवासन दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे परराष्ट्र विभागाने त्यांचा व्हिसा रद्द केला आणि त्यांनी सीपीबी होम ॲपचा वापर करून अमेरिकेतून स्व-निर्वासन स्वीकारले.”
गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी विमानतळावर रंजनी श्रीनिवासन यांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, “हिंसाचार आणि दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या कोणालाही अमेरिकेत असण्याचा अधिकार नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील ही विद्यार्थिनी हमासच्या समर्थनार्थ निदर्शनांमध्ये सहभागी झाली होती, ज्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली.
आणखी एका विद्यार्थीनाला अटक
कोलंबिया विद्यापीठातील आणखी एका विद्यार्थिनीला लेका कोरडिया हिला विद्यार्थी व्हिसाची मुदत संपल्यामुळे अटक करण्यात आली. ती देखील पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाली होती. या प्रकरणांमुळे कोलंबिया विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांवर सरकारची करडी नजर असल्याचे स्पष्ट होते.
कोलंबिया विद्यापीठाला 33 अब्ज डॉलर रुपयांची मदत ट्रम्प प्रशासनाने थांबवली आहे. मार्च 2025 च्या सुरुवातीला हा निर्णय घेण्यात आल होता. तसेच अनेक विद्यार्थांना हमासला समर्थन आणि इस्त्रायला विरोध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच पॅलेस्टिनी विद्यार्थी आणि निदर्शकांना देखील अटक करण्यात आली आहे.