Indian Student Killed In Canada, police arrested 32 year man in charged of murder
Indian Stndent Killed In Canada : ओटावा : एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडामध्ये (Canada) एका भारतीय विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण कॅनडा हादरला आहे. 21 वर्षीय हरसमिरत रंधावा हिला गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे. या प्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही काळात कॅनडामध्ये भारतीयांच्या हत्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडाच्या हॅमिल्टन शहरात ही घटना घडली आहे. हॅमिल्टनच्या पोलिसांनी हरसिमरत रंधावाच्या हत्येप्रकरणी एका 32 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. जर्डेन फोस्टर असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी जर्डेनला ताब्यात घेतले असूव त्याच्यावर इतर तीन खुनांचा प्रयत्नाचे देखील आरोप आहेत.
‘भारत हा उत्तम….’ ; अमेरिकेन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा; टॅरिफबाबत दिला सल्ला
उपचारादरम्यान विद्यार्थीनाचा मृत्यू
हॅमिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसिमरत रंधावा ‘अपर जेम्स स्ट्रीट’ आणि ‘साउथ बेंड रोड’ च्या चौकात असलेल्या बस स्टँडजवळ उभी होती. यावेळी तिला अचानक गोळी लागली. त्यानंतर हरसिमरतला रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 17 तारखेला ही घटना घडली होती. याचे वृत्त आता समोर आले आहे. हॅमिल्टन पोलिसांनी ओंटारियोच्या नायगारा फॉल्स येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हरसिमरत जिममधून घरी निघाली होती. यावेळी एका रस्त्यावर काही लोकांमध्ये वाद सुरु होता. यावेळी अचानक गोळीबार सुरु झाला. या गोळीबारादरम्यान एक गोळी हरसिमरतला लागली. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार हरसिमरत जिममधून घरी परतत होती. यावेळी ही घटना घडली. सध्या या प्रकणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु या हरसिमरतची चूकी नसताना तिला आपला जीव गमावाव लागाल.
गेल्या काही काळात कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या आकेडवारीनुसार, कॅनडामध्ये 2020 ते 2024 दरम्यान 1,203 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेकांचा मृत्यू वृद्धत्व किंवा गंभीर आजारांमुळे झाला आहे. तसेच यामध्ये काहींचा मृत्यू अपघात, हिंसाचार, खून यांसारख्या कारणांमुळे देखील झाले आहेत. गेल्या पाच वर्षात ही संख्या वाढत आहे. आतापर्यंत 757 भारतीयांचे मृतहेद देशात परत आणण्यात आले आहत.
FAQs (संबंधित प्रश्न)
कॅनडामध्ये आतापर्यंत किती भारतीयांचा मृत्यू झाला?
कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 1203 भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूचे कारण काय?
अनेकांचा मृत्यू वृद्धत्व किंवा गंभीर आजारांमुळे झाला आहे. तसेच यामध्ये काहींचा मृत्यू अपघात, हिंसाचार, खून आणि आत्महत्या यांसारखी कारणे देखील आहेत.