Trump celebrated Diwali at the White House, claims to have spoke with pm Modi on about trade
Diwali Celebration at White House : वॉशिंग्टन : सध्या संपूर्ण भारतात दिवाळीचा आनंद पाहायला मिळत आहे. पण केवळ भारतातच नाही तर परदेशातही दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. अगदी पारंपारिक पद्धातीने दिवा प्रज्वलित करुन भारतीयांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्याचे आणि व्यापारासह विविध विषयांवर चर्चा केल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटले की, हा सण केवळ प्रकाशाचा नव्हे, तर चांगल्याचा वाईटावर विजय आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वांना शांतता, समृद्धी आणि दिवाळीच्या आनंदाने शुभेच्छा. आपल्याला एकत्र येऊन नवीन आशा आणि उर्जा घेऊन जगण्याची प्रेरणा निर्माण करायची आहे असेही त्यांनी म्हटले.
याशिवाय ट्रम्प यांनी असाही दावा केला की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा केली आहे. या चर्चेत त्यांनी भारत आणि अमेरिका संबंध मजबूत करणाऱ्यावर आणि व्यापारातील तणाव दूर करण्यावर चर्चा केल्याचा दावा केला. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या दाव्याचाही पुन्हा उल्लेख केला, ज्याला भारताने स्पष्ट नकार दिला होता.
याशिवाय ट्रम्प यांनी पुन्हा एकाद रशियन तेल खरेदीवरुन निशाणा साधत भारत मॉस्कोकडून तेल खरेदी करणार नसल्याचा दावा केला आहे. मात्र भारत सरकारने अद्याप यावर कोणतेही पुष्टी केलेली नाही. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी अनेक वेळा भारताने रशियाकडून खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला होता. पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला होता आणि स्पष्ट केले होते की, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या कोणताही फोनवरुन कोणताही संपूर्क झालेला नाही.
#WATCH | Washington, DC | On the occassion of Diwali, US President Donald Trump says, “Let me extend our warmest wishes to the people of India. I just spoke to your Prime Minister today. Had a great conversation. We talked about trade… He’s very interested in that. Although we… pic.twitter.com/xqQeNKnIpq — ANI (@ANI) October 21, 2025
प्रश्न १. अमेरिकेच्या व्हाईट हाईसमध्ये कशी साजरी झाली दिवाळी?
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पारंपारिक पद्धतीने दिप प्रज्वलित करुन दिवाळी साजरी करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील दिप प्रज्वलित केले.
प्रश्न २. दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी काय म्हटले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्वांना शांतता, समृद्धी आणि दिवाळीच्या आनंदमयी शुभेच्छा देतो. हा प्रसंग केवळ प्रकाशाचा नव्हे, चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवणार आहे.
प्रश्न ३. ट्रम्प यांनी दिवाळीच्या प्रसंगी भारताबद्दल कोणते दावे केले?
ट्रम्प यांनी दिवाळीच्या प्रसंगी ते पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच त्यांनी म्हटले की, मोदींशी मी भारत अमेरिका संबंध पुन्हा स्थिर करण्यावर चर्चा केली. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा केला.
कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले…