Indian woman arrested in US, Police take action in theft of Rs 1 lakh
वॉशिंग्टन : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत एका भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिलेवर सुपरमार्केटमधून १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव इलिनॉय आहे. तिच्या अमेरिकेच्या टार्गेट स्टोअरमधून चोरी केल्याचा आणि पैसे न देता पळून गेल्याचा आरोप आहे. अमेरिकन पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची मोठी चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलिनॉयवर टार्गेट स्टोरमध्ये सात तासांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांना सीसीटिव्हीमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी महिलेकडून चोरीचा माल जप्त केला आहे. या भारतीय महिलेवर सुमारे १, ३०० डॉलर्स म्हणजेच १.०८ लाख रुपयांच्या किमतीच्या वस्तू चोरल्याचा आरोप आहे.
सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्याला महिला पैस न देता वस्तूंनी भरलेली ट्रॉली बाहेर घेऊन जात होती. यावेळी कर्माचाऱ्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले की, महिला जवळपास सात तास दुकानात फिरत होती. फोनवर बोलता बोलता वस्तू उचलत होती. आपण सीसीटिव्हीत दिसू नये म्हणून ती एका बाजूने लपून जात होती. परंतु ती बाहेर पडताना कर्मचाऱ्याने तिला पकडले. त्यानंतर त्याने पोलिसांना बोलावले.
अमेरिकन सोशल मीडिया पर एक भारतीय महिला का वीडियो वायरल हो रहा है। 45 वर्षीय जिमिशा या अनाया अवलानी नामक यह महिला अमेरिका के इलिनॉय में टारगेट स्टोर में $1300 के सामान की चोरी करते पकड़ी गई। घंटों शॉपिंग के बाद बिना भुगतान किए निकलने की कोशिश में सिक्योरिटी ने उसे पकड़ा। पुलिस से… pic.twitter.com/cKWAIBxUR6
— Pankaj (@TPankaj001) July 15, 2025
दरम्यान पोलिसांनी इलिनॉयला ताब्यात घेतले आहे. यावेळी तिने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तिन सांगतिले की, ती अमेरिकेची नागरिक नाही. परंतु तिला इथे राहयचे आहे. तिने आपली चूक मान्य केली आणि या बदल्यात पैसे देण्यास तयार असल्याचे म्हटले. यावर महिला पोलिस अधिकाऱ्यांनी भारतात चोरीला परवानगी आहे का? असा प्रश्न केला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी महिलेवर टीका केली आहे. दरम्यान ही महिला भारतीय आहे का नाही याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परंतु सध्या या घटनेने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे.