
Indians died in bus accident will be cremated in Saudi Arabia
Saudi Bus Accident News in Marathi : रियाध : सौदी अरेबियात (Saudi Arabia) एक भीषण दुर्घटना घडली होती. उमराह यात्रा पूर्ण करुन मक्केला निघालेल्या एका बसचा (Bus Accident) भीषण अपघात झाला होता. या अपघातात ४५ भारतीयांना आपले प्राण गमावले होते. या सर्वांवर आता सौदी सरकार अत्यंतसंस्कार करणार आहे. मक्का आणि महिनाजवळ हे अत्यंतसंस्कार केले जातील अशी माहिती मिळाली आहे.
Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा सरकारने सौदी अरेबियाला मृत्यूमुखी पजलेल्यांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्याची विनंती केली होती. याला सौदी सरकारने सहमती दर्शवली असून सौदीने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केले आहे. यातील बहुतेक प्रवासी तेलंगणाच्या हैदराबादमधील होते. यामुळे कुटुंबातील ३५ जण सौदीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी खर्चाने सौदीला पाठवण्यात आले आहे. सौदीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांवर इस्लामिक परंपरेनुसार अत्यंसंस्कार होणार आहेत. तसेच तेलंगरणा सरकारचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद अझरुद्दीन या प्रकरणाचे सध्या निरीक्षण करत आहे. ते देखील सौदी अरेबियाला पोहोचले आहेत.
सध्या सौदी अरेबिया डीएनएद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचे कार्य करत आहे. काहींची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृत्यू प्रमाणापत्र देखील देण्यात आले आहे. काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण जात आहे. अनेकांचे मतदेह आगीत पूर्णपणे जळाले आहेत. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (२० नोव्हेंबर) अत्यंसंस्काराची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
सौदी अरेबियाला उमराह यात्रेसाठी हे ४५ भारतीय गेले होते. उमराहची यात्रा त्यांची शेवटची यात्रा ठरली. मीडिया रिपोर्टनुसार, मक्का-मदिना मार्गावर हा अपघात झाला होता. एका तेल टॅंकर आणि बसची जोरदार धडक झाली होती. सौदी अरेबियात यापूर्वी देखील असे अनेक अपघात घडले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत म्हटले होते की, सौदी मदीना येथे झालेल्या अपघातामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. जखमींच्या बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाच्या आम्ही संपर्कात आहोत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
सौदी अरेबियात मोठी दुर्घटना; रस्ते अपघातात 9 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू