Indians jugad on Donald Trump's H1B visa hike
H-1B Visa News in Marathi : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसात मोठा बदल केला आहे. H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून १ लाख अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयांमध्ये ९० लाख) वाढवली आहे. पण या निर्णयामुळे सर्वाधिक फटका भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांना बसणार आहे. पण अमेरिकेने हे स्पष्ट केले आहे की, जुन्या व्हिसा धारकांना हा नियम लागू होणार नाही, तर व्हिसासाठी नवीन अर्ज करणाऱ्यांना हा नियम लागू होईल.
पण यामुळे भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांसोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कारण हा व्हिसा भारतीयांचा अमेरिकेत नोकरी करण्याचा सोपा आणि लोकप्रिय मार्ग होता. आता मात्र याच्या शुल्कात वाढ झाल्याने कंपन्यांनी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.
US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका
यासाठी भारतीयांनी पर्यायी मार्ग शोधला आहे. भारतीय कंपन्यांचा कल L-1 व्हिसाकडे वळत आहे. L-1 व्हिसा हा H-1Bच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि सोयीचा असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. या L-1 व्हिसावर कोणतीही मर्यादा नाही. यामुळे एखादी कंपनी आधीच नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याला परदेशातून थेट अमेरिकेत ट्रान्सफर करु शकते. यामुळे भारतीय आयटी कंपन्या L-1 व्हिसाचा मार्ग स्वीकारत आहे.
याच वेळी L-1 व्हिसा हा परिपूर्ण उपाय नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्हिसासाठी कर्मचाऱ्यांना परदेशी कंपनीसोबत किमान एक वर्षाचा अनुभव लागतो. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना L-1 व्हिसावर अमेरिकेत पाठवता येणार नाही. शिवाय व्हिसावर अमेरिकेने कडक नियम आणि तपासणी लागू केली आहे. यामुळे चौकशी दरम्यान अर्ज नाकारला जाण्याची शक्यता अधिक आहे.
तज्ज्ञांच्या मते, कंपन्या जितक्या जास्त प्रमाणात या व्हिसाचा वापर करतील तितक्याच वेगाने ट्रम्प प्रशानाची यावर नजर वाढेल. यामुळे भविष्यात या व्हिसावरही अटी लागू होण्याची शक्यता आहे. H-1B व्हिसाच्या खर्चापासून बचावासाठी हा पर्याय केवळ तात्पुरत्या काळासाठी व्यवहार्य आहे. मात्र याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली?
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत म्हणजे ९० लाख भारतीय रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावयिकांनी कोणता H-1B व्हिसाला कोणता पर्याय अवलंबला?
H-1B व्हिसाला पर्याय म्हणून भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिक L-1 व्हिसाकडे वळत आहे.
काय आहे तज्ज्ञांचे मत?
तज्ज्ञांच्या मते, L-1 व्हिसाच्या जास्त वापरामुळे यावर भविष्यात शुल्क लादला जाण्याची शक्यता आहे. तसेच यासाठी परदेशात एक वर्षाच्या कामाचा अनुभव लागतो यामुळे हा व्हिसा नव्या लोकांना वापरता येणार नाही. शिवाय याचे नियम आणि तपासणी देखील अत्यंत कडक आहे.
H-1B व्हिसा शुल्कात वाढ अन् भारतीयांना झाला मनस्ताप; तरुणांनी विमानामध्येच व्यक्त केला संताप, VIDEO