H-1B व्हिसा शुल्कात वाढ अन् भारतीयांना झाला मनस्ताप; तरुणांनी विमानामध्येच व्यक्त केला संताप, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
H-1B Visa news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. भारतात येणाऱ्या एका विमानातील विद्यार्थ्यांना ताबडतोब उतरण्यास सांगण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्रम्प यांनी २० सप्टेंबर रोजी H-1B व्हिसा शुल्क वाढीच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांनी H-1B व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ केली आहे. मात्र याचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसावर नोकऱ्या करणाऱ्यांमध्ये भारतीयांचे सर्वाधिक प्रमाण आहे.
US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या आतंरराष्ट्रीय विमातळावर भारतात येणाऱ्या एका प्लेन मध्ये गोंधळ उडाला होता. शुल्क वाढीची बातमी ऐकताच अनेकांना पुन्हा अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळण्याची भीती वाटू लागली. यामुळे एक-एक प्रवासी विमानतून उतरु लागले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, विमान टेकऑफच्या वेळी असताना लोक बाहेर पडण्यासाठी विनंती करु लागले होते.
याचा व्हिडिओ शेअर करत सांगण्यात आले की, भारतीयांनी भरलेले एक विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना H-1B व्हिसा शुल्क वाढीच बातमी मिळाली. यामुळे भारतीयांमध्ये गोंधळ उडाला. सध्या हा व्हिडिओची पडताळणी करण्यात आलेली नाही, परंतु दावा केला जात आहे की, विमानतील भारतीयांच्या गोंधळामुळे उड्डाण तीन तास उशिराने झाले.
Someone on instagram posted a video from San Francisco 👇
Chaos for Emirates passengers at San Francisco Airport Friday morning after Trump’s #h1b order panicking Indian passengers and some leaving aircraft.
As a result, aircraft was delayed for three hours amidst announcement pic.twitter.com/MWo859gPlx
— URScrewed 🇬🇧 (@URScrewed_) September 20, 2025
पण याच वेळी अमेरिकन प्रशासानेने स्पष्ट केले आहे की, विद्यमान H-1B व्हिसा धारकांना हा नियम लागू होणार नाही. H-1B व्हिसासाठी नवीन अर्ज करणाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे. तसेच वर्षाला ही फी आकारली जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे. याचा उद्देश अमेरिकेतील लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि देशात केवळ कुशल कामगार आणणे आहे.
काय आहे H-1B व्हिसा?
H1B व्हिसा हा परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकच्या विशिष्ट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा, अमेरिकेत व्यवसायांमध्ये संधी देतो. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. सहा वर्षांपर्यंत वाढवण्याची यामध्ये सवलत असते.
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली?
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत म्हणजे ९० लाख भारतीय रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावर काय होणार परिणाम?
अमेरिकेच्या H-1B व्हिसावरील शुल्क वाढीमुळे भारतीय आयटी क्षेत्रावर, व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका