
फोटो सौजन्य AI
कमी खर्च , पटकन व्हिसा , आणि भारतातून थेट विमान सेवा तसेच समुद्र किनारे व ऐतिहासिक ठिकाणे तसेच शहरे हे भारतीयांना आकर्षित करत आहेत . सरकारी आकड्या नुसार गेल्या २०१९ च्या तुलनेत २०२४ पर्यंत व्हियेतनाम मध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत चार पटीने वाढ झाली आहे . यामुळे हा देश भारतीयांच्या आवडीचा देश म्हणून बोलले जात आहे .
व्हियेतनाम हा दक्षिण-पूर्व आशियातील एक देश आहे. एका बाजूला याला लांब समुद्र किनारा आहे, तर दुसऱ्या बाजूला दाट जंगले आहेत. सुमारे 10 कोटी लोकसंख्या असलेला हा देश जवळपास 3.32 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हा राजस्थान पेक्षा 3.42 लाख चौरस किलोमीटर लहान आहे.व्हियेतनामचे समुद्रकिनारे हे देशाच्या सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक आहेत. न्हा त्रांग, दा नांग आणि फू क्वोक सारखे स्वच्छ, निळे समुद्रकिनारे पर्यटकांना विशेष मोह घालतात. देशाच्या अनेक भागांमध्ये हिरवळ दिसून येते. डोंगर, भातशेती आणि नद्या यामुळे निसर्गप्रेमींसाठी वियतनाम स्वर्गासारखं वाटतं.येथील प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दा नांग यांचा समावेश आहे. हनोईमध्ये ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती, हो ची मिन्ह सिटीमध्ये आधुनिक जीवनशैली आणि दा नांगमध्ये समुद्रकिनारे व पुलं पाहायला मिळतात. याशिवाय हॅ लॉन्ग बे, सापा आणि हॉई अन ही ठिकाणेही खूप प्रसिद्ध आहेत.पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोकांच्या मते, गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामागे अनेक कारणं आहेत. हैदराबादमधील इमाद ट्रॅव्हल्सचे संचालक हमीद अली यांनी बीबीसीला सांगितले, भारतीयांना नवीन ठिकाणे पाहायला आवडतात. व्हियेतनाम हे आता खूप कमी खर्चात फिरता येण्यासारखं पर्यटन स्थळ बनलं आहे. थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवास सोपा झाला आहे. शिवाय व्हिसा प्रक्रिया सोपी, स्वस्त राहण्याची सोय, चांगलं जेवण आणि सुरक्षितता यामुळे कुटुंबांसह तरुणही व्हियेतनामला पसंती देत आहेत. सुमारे 10 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात निसर्ग, इतिहास आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळे पुढील काळात भारतीय पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.