Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश

Nagpur News : नेपाळ-तिबेट सीमेवरील अतिवृष्टीमुळे आलेल्या फ्लॅश १०२ फ्लडच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये अडकलेले विदर्भातील चार तीर्थयात्री शनिवारी सकाळी सुखरूप उपराजधानीत परतले. चौघांमध्ये तीन ज्येष्ठांचा समावेश आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 02:09 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • विमानाने दिल्ली गाठली
  • शंभर भाविक आज पोहोचतील
  • खासदारांकडून मदतीचा हात
Nagpur News : वर्धा येथील इंदिरा चौधरी (६५), सुलोचना खापरे तसेच हिंगणघाट येथील दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय हे चौघे १९ ऑगस्टला विदर्भातून गेलेल्या तीर्थयात्रेकरूंसोबत पशुपतिनाथ यात्रेसाठी नेपाळला रवाना झाले होते. १९ ऑगस्टला रेल्वेने प्रवास सुरू झाला. २१ ऑगस्टला ते पशुपतिनाथ मंदिरात पोहोचले. २५ ऑगस्टनंतर ते काठमांडूला परतले.

फ्लॅश फ्लड ज्या नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात आला त्या परिसरात ते गेले नव्हते, असे सुलोचना खापरे यांनी सांगितले. २७ ऑगस्टच्या रात्री ते यात्रेवरून काठमांडूला परतले. मात्र, पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुढील प्रवास करता आला नाही. त्यांना काठमांडूमध्येच अडकून राहावे लागले, असे इंदिरा चौधरी यांनी सांगितले.

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम

विमानाने दिल्ली गाठली

काठमांडूहून भारतात परतण्यासाठी खासदार संदीप राणा यांच्या माध्यमातून १०६ तीर्थयात्रेकरूंसाठी बसची व्यवस्था केली होती. मात्र, २७ ऑगस्टच्या रात्री अचानक हवामान खराब झाल्याने बस लेले गावाजवळून पुन्हा काठमांडूकडे परतली, त्यामुळे चौधरी यांचा मुलगा हर्षल यांच्यासह नागपुरातील काही नातेवाईकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बसने नेपाळ-बिहार सीमेपर्यंत जाण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर चौघांसाठी काठमांडूहून दिल्लीपर्यंत विमानाचे तिकीट काढले, चौघांनी बसमधून जाणाऱ्या अन्य यात्रेकरूंसोबत न जाता विमानाने काठमांडूहून दिल्ली गाठली, त्यानंतर दिल्लीहून केरळ एक्सप्रेसने प्रवास करून ते शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. चारही तीर्थयात्री सुखरूप परतल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

शंभर भाविक आज पोहोचतील

नागपुरातील अन्य शंभर तीर्थयात्री बिहारमधील पाटणा येथून गुरुवारी सकाळी पाटणा-नांदेड एक्सप्रेसने नागपूरकडे निघाले. रविवारी पहाटे ते पोहोचतील. दोन पर्यटक अजूनही काठमांडूमध्ये आहेत. निर्मला पांडे यांची प्रकृती बिघडल्याने काठमांडू येथील शहीद गंगालाल नेशनल हार्ट केयर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

त्यांची अॅन्जिओग्राफी झाली. अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार व प्रयत्नांमुळे भाविक सुखरूप पोहोचत आहे. संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भाविक व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले

खासदारांकडून मदतीचा हात

खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढी येथे यात्रेकरूंची भेट घेऊन संवाद साधला आणि नेपाळमधील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांनी यात्रेकरूंच्या राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली.

यात्रेकरूंना सुरक्षितपणे पुढील प्रवास करता यावा, यासाठी त्यांनी रेल्वे अधिका-यांशीही चर्चा केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून शंभर यात्रेकरूंच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर त्यांचा भारतात परतीचा प्रवास शक्य होत आहे.

 

Web Title: Nagpur news four pilgrims stranded in nepal have reached nagpur the group includes three senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Indian Tourist
  • Nagpur News
  • Nepal Flash Flood

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
1

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!
2

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
3

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत
4

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.