Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indonesia Factory Fire: इंडोनेशियात मोठी दुर्घटना! प्रसिद्ध कँडी कारखान्याला भीषण आग; 3 कामगारांचा मृत्यू, तर 36 जण अद्याप बेपत्ता

Indonesia Factory Fire: इंडोनेशियाच्या बांटेन प्रांतातील एका कँडी कारखान्यात आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून ३६ कामगार बेपत्ता आहेत. चार जखमींसह पंधरा जणांना वाचवण्यात आले आहे. इंडोनेशियातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात एका कँडी फॅक्टरीला भीषण आग लागली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 22, 2026 | 03:04 PM
Indonesia Candy Factory Fire PT Fonusa Agung Mulia Fire Banten Factory Fire News

Indonesia Candy Factory Fire PT Fonusa Agung Mulia Fire Banten Factory Fire News

Follow Us
Follow Us:
  • भीषण आगीत ३ जणांचा मृत्यू
  • ३६ कामगार अद्याप बेपत्ता
  • १२ तासांनंतरही धुमसतेय आग

इंडोनेशियाची (Indonesia Factory Fire) राजधानी जकार्ताला लागून असलेल्या बांटेन प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील सेरांग जिल्ह्यातील सिकंडे (Cikande) परिसरात असलेल्या एका मोठ्या कँडी बनवणाऱ्या कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीने इतके रौद्र रूप धारण केले की संपूर्ण तीन मजली कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, तब्बल ३६ कामगार अद्याप बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीटी फोनुसा अगुंग मुलिया’ (PT Fonusa Agung Mulia) असे या कारखान्याचे नाव असून, येथे प्रसिद्ध ‘मिल्किटा’ (Milkita) ब्रँडच्या दुधावर आधारित कँडी आणि स्नॅक फूड्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक आग भडकली. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी आणि काळ्या धुराच्या लोटांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला. या भीषण आगीचे काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

थरारक बचावकार्य: ४ जखमींसह १५ कामगारांना वाचवण्यात यश

घटनेची माहिती मिळताच इंडोनेशियाच्या ‘राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने’ (BASARNAS) तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बचाव पथकांनी प्राणांची बाजी लावून आगीच्या विळख्यात अडकलेल्या १५ कामगारांना जिवंत बाहेर काढले आहे. यामध्ये चार कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ओळख पटवण्यासाठी ते रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कारखान्याच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी ही आग लागली तेव्हा कारखान्यात सुमारे ३०० कामगार कामावर होते. सुरुवातीला ५४ कामगार बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात होती, त्यापैकी १५ जणांची सुटका झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, मात्र उर्वरित ३६ कामगारांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bali Ganesha: ‘या’ मुस्लिम देशातील 50 फूट उंच भव्य गणेश मूर्तीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; वाचा नेमकी काय आहे खासियत?

 १२ तासांहून अधिक काळ लोटला, तरीही कारखान्यात आग धुमसतेच

या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की दुर्घटना घडून १२ तासांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतरही कारखान्याच्या अनेक भागांत आग धुमसतच आहे. सेरांग जिल्हा आणि बांटेन प्रांतातील अग्निशमन दलाचे शेकडो जवान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इमारत थंड करण्यासाठी (Cooling Operations) अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

Indonesia: The death toll from the massive fire at the PT Fonusa Agung Mulia candy factory in Cikande, Banten, is rising, with six body bags evacuated from the site. Rescue teams continue searching for many missing workers. https://t.co/Fi4dTHmy9W — Weather Monitor (@WeatherMonitors) November 22, 2026

credit – social media and Twitter

बांटेन शोध आणि बचाव संस्थेचे अधिकारी रिझकी द्वियांतो यांनी सांगितले की, कारखान्याच्या मध्यभागी आणि मागील भागात अजूनही आगीचे हॉटस्पॉट्स कायम आहेत. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे या तीन मजली इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला असून, आतील लोखंडी सांगाडे वाकले आहेत. इमारतीचा सांगाडा कमकुवत झाल्यामुळे बचाव पथकांना आत शिरून बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंडोनेशियन रेड क्रॉस आणि स्थानिक प्रशासन या बचावकार्यात पूर्ण ताकदीने सहभागी झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Donald Trump : ‘मला इराणमध्ये सत्तापालट नकोय, पण…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली मोठी मागणी; अण्वस्त्रांवरून दिला थेट इशारा

 आग नेमकी कशामुळे लागली? तिसऱ्या मजल्यावरून भडकला वणवा

या भीषण आगीमागचे नेमके अधिकृत कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, आगीतून सुखरूप बचावलेले काही कामगार आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका ‘कुलिंग युनिट’मधून (Cooling Unit) ही आग सुरू झाली. कँडी बनवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे आणि साखर व इतर ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण मजला आपल्या कवेत घेतला.

घटनेनंतर कारखान्याच्या बाहेर बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींची कोणतीही खबर न मिळाल्याने कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि शोकाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे.

इंडोनेशियातील औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

गेल्या काही वर्षांत इंडोनेशियात कारखान्यांना आग लागण्याच्या आणि औद्योगिक दुर्घटनांच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. यामुळे तेथील कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांबाबत पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. बेपत्ता असलेल्या ३६ कामगारांचा शोध घेणे हेच सध्या प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Web Title: Indonesia banten candy factory fire 3 dead 36 missing hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • fire Accident
  • Indonesia
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump : ‘मला इराणमध्ये सत्तापालट नकोय, पण…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली मोठी मागणी; अण्वस्त्रांवरून दिला थेट इशारा
1

Donald Trump : ‘मला इराणमध्ये सत्तापालट नकोय, पण…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली मोठी मागणी; अण्वस्त्रांवरून दिला थेट इशारा

Awa Tribe : जगापासून अलिप्त आदिम जीवन जगणारी ‘आवा’ जमात आली गावाजवळ; ॲमेझॉनमधील घडामोडींनी वाढवली चिंता, VIDEO VIRAL
2

Awa Tribe : जगापासून अलिप्त आदिम जीवन जगणारी ‘आवा’ जमात आली गावाजवळ; ॲमेझॉनमधील घडामोडींनी वाढवली चिंता, VIDEO VIRAL

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?
3

Tulsi Vivah 2026 : केवळ भारतातच नाही, तर ‘या’ 5 मुस्लिम देशांमध्येही तुळशीला आहे प्रचंड मागणी; जाणून घ्या नेमका कशासाठी होतो वापर?

Iraq News : इराकच्या बसरामध्ये वीज केंद्राला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी आणि ज्वाला थेट घरांपर्यंत पोहोचल्या
4

Iraq News : इराकच्या बसरामध्ये वीज केंद्राला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी आणि ज्वाला थेट घरांपर्यंत पोहोचल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.