Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus River Project : लडाखमध्ये सिंधू नदीवर भारताचा पहिला रॉक चेक डॅम; ४ कोटी लिटर पाणी साठवणार

Indus River Project : लडाखच्या उप्शी येथे सिंधू नदीवर भारताचा पहिला रॉक चेक डॅम उभारण्यात आला आहे. नैसर्गिक दगडांपासून तयार केलेल्या या संरचनेमुळे नदीची पाणीपातळी जवळपास १० फूट वाढली असून सुमारे ४ कोटी लिटर पाणी साठवता येणार आहे. यामुळे स्थानिक शेती आणि सिंचनाला मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 09:23 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सिमेंटविना दगडाचा वापर ; नदीची पाणीपातळी दहा फूट वाढली
  • लडाख मधील शेतीला मोठा फायदा
  • आणखी ३६ चेक डॅम उभारण्याची घोषणा
Indus River Project : लडाखच्या लेह जिल्ह्यातील उप्शी परिसरात सिंधू नदीवर भारताने पहिला रॉक चेक डॅम उभारला आहे . नैसर्गिक मोठ्या दगडांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या संरचनेचा उद्देश स्थानिक भागातील पाणीटंचाई कमी करणे आणि शेतीसाठी सिंचनाची सुविधा वाढवणे हा आहे . लडाख प्रशासनाच्या माहितीनुसार हा प्रकल्प सिंधू जल समृद्धी अभियान अंतर्गत उभारण्यात आला आहे .

सिमेंटविना दगडाचा वापर ; नदीची पाणीपातळी दहा फूट वाढली

उप्शी येथे उभारण्यात आलेला हा रॉक चेक डॅम पारंपरिक काँक्रीट धरणापेक्षा वेगळा आहे . मोठमोठे नैसर्गिक दगड एकमेकांमध्ये व्यवस्थित बसवून ही संरचना तयार करण्यात आली आहे . त्यामुळे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर सिमेंट किंवा काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही . या चेक डॅम मुळे नदीच्या पाण्याची पातळी जवळपास १० फूट वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे .

Gaza Crisis : गाझातील पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याच्या योजनेवरून वाद

लडाख मधील शेतीला मोठा फायदा

लडाख हा उंच पर्वतीय आणि थंड वाळवंटी प्रदेश असल्याने शेतीसाठी पाणी मिळणे मोठे आव्हान आहे . उप्शी परिसरातील शेतकऱ्यांना खासकरून पेरणीच्या काळात सिंचनाच्या पाण्याची कमतरता जाणवत होती . सिंधू नदी खोल दरीतून वाहत असल्याने नदीतील पाणी थेट उचलणेही अनेकदा कठीण होते .

रॉक चेक डॅम मुळे पाणी काही प्रमाणात अडवून त्याची पातळी वाढवता येणार आहे . त्यातून Igoo – Phey सिंचन कालव्याला पाणी देण्यास मदत होणार असून स्थानिक शेतीला फायदा अपेक्षित आहे .

Ukraine War : एअर रेड अलर्ट सुरू असतानाच महिलेची प्रसूती; युद्धाच्या छायेत जन्माला आले बाळ

आणखी ३६ चेक डॅम उभारण्याची घोषणा

उप्शी येथील प्रकल्पाच्या यशानंतर लडाख प्रशासनाने केंद्राकडे आणखी ३६ चेक डॅम प्रकल्पांचा प्रस्ताव पाठवला आहे . यामध्ये लेह परिसरात ७ हिमालयीन रॉक चेक डॅम , तर कारगिलमध्ये २९ RCC चेक डॅम किंवा वेअर्सचा समावेश आहे . या प्रकल्पासाठी ५६ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा अंदाज आहे . सिंधू जल कराराबाबत भारत – पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील हा प्रकल्प चर्चेत आला आहे . मात्र प्रशासनाकडून या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश स्थानिक जलसुरक्षा , सिंचन आणि शेतीला चालना देणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .

 

 

Web Title: Indus river project indias first rock check dam on the indus river in ladakh to store 4 crore liters of water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • india- Pakistan
  • Indus Water
  • Indus Water Treaty
  • Leh Ladakh
  • sindhu river

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty: ‘आम्ही चिनाब धरण मिसाइलने उडवून देऊ’; सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानी पत्रकाराची भारताला अणूधमकी
1

Indus Waters Treaty: ‘आम्ही चिनाब धरण मिसाइलने उडवून देऊ’; सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानी पत्रकाराची भारताला अणूधमकी

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला
2

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.