Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Space Station : अंतराळातील एका सुवर्णयुगाचा अंत! वाचा 450 टनांचे ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ का नष्ट करतंय NASA?

International Space Station: नासा कोणतीही उणीव टाळण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पुढे काय वाढून ठेवले आहे हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. २०३० नंतर, अंतराळ पूर्वीसारखे राहणार नाही. ते आणखी व्यस्त आणि अधिक मनोरंजक होईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 12, 2026 | 12:19 PM
international space station iss retirement 2030 nasa spacex deorbit plan

international space station iss retirement 2030 nasa spacex deorbit plan

Follow Us
Follow Us:
  • आयएसएसचा ऐतिहासिक प्रवास थांबणार
  • समुद्रात होणार अंत्यसंस्कार
  • खाजगी कंपन्यांचे नवे पर्व

International Space Station retirement 2030 : ब्रह्मांडाच्या अथांग पसाऱ्यात पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवर तरंगणारी मानवाची सर्वात मोठी प्रयोगशाळा म्हणजेच ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ (ISS) आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून जगातील वेगवेगळ्या देशांचे अंतराळवीर जिथे एकत्र राहून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवे चमत्कार शोधत होते, ते अवकाशातील घर आता इतिहास जमा होणार आहे. नासाने (NASA) जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, २०३० मध्ये या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला सेवानिवृत्त केले जाईल. ही केवळ एक साधी प्रक्रिया नसेल, तर तब्बल १ अब्ज डॉलर (सुमारे ९,५०० कोटी रुपये) खर्च करून या महाकाय स्थानकाला पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट केले जाईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण जगाचे आणि अंतराळ विज्ञानाचे भविष्य कसे बदलणार, यावर आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

नेमके काय आहे ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ आणि त्याचा इतिहास?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा मानवी इतिहासातील सर्वात महागडा आणि गुंतागुंतीचा संयुक्त प्रकल्प मानला जातो. १९९८ मध्ये या स्थानकाचा पहिला भाग अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यानंतर वर्ष २००० पासून इथे वैज्ञानिक सातत्याने राहू लागले. अमेरिका (NASA), रशिया (Roscosmos), जपान (JAXA), युरोप (ESA) आणि कॅनडा (CSA) या पाच देशांच्या अंतराळ संस्थांनी एकत्र येऊन हे फुटबॉलच्या मैदानाएवढे मोठे स्टेशन उभारले होते. सुमारे ४ लाख ५० हजार किलोग्रॅम वजनाची ही प्रयोगशाळा दर ९० मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून विज्ञानासाठी जगातील महासत्ता कशा एकत्र काम करू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा

एवढे मोठे स्पेस स्टेशन नष्ट करण्याची वेळ का आली?

आयएसएसने आपले नियोजित आयुष्य कधीच पूर्ण केले आहे. अनेकदा दुरुस्ती करून त्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला, परंतु आता हे स्पेस स्टेशन म्हातारे झाले आहे. प्रामुख्याने तीन कारणांमुळे नासा हे स्टेशन बंद करत आहे:

१. वाढते वय आणि जीवघेणी गळती: गेल्या ५ वर्षांपासून आयएसएसच्या रशियन विभागातील ‘झ्वेझ्दा’ (Zvezda) मॉड्यूलमध्ये सतत हवेची गळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. अलीकडेच ५ जून २०२६ रोजी ही गळती इतकी गंभीर झाली होती की, अंतराळवीरांना आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नासाच्या महानिरीक्षकांनी या वाढत्या भेगांना “सर्वात मोठा सुरक्षा धोका” घोषित केले आहे.

२. देखभालीचा प्रचंड खर्च: आयएसएसला कार्यरत ठेवण्यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. नासाला आता हा अवाढव्य पैसा जुन्या स्टेशनवर खर्च करायचा नाहीये. हाच निधी वाचवून नासाला ‘आर्टेमिस’ (Artemis) मोहिमेद्वारे मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवायचे आहे आणि भविष्यात मंगळ ग्रहावर जाण्याची तयारी करायची आहे.

३. खाजगी क्षेत्राचे आगमन: अंतराळ क्षेत्रात आता व्यावसायिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर उतरल्या आहेत. नासाला स्वतःचे स्टेशन चालवण्याऐवजी खाजगी कंपन्यांच्या स्पेस स्टेशनमध्ये जागा भाड्याने घेणे अधिक सोयीचे आणि स्वस्त वाटत आहे.

कसे केले जाईल डिऑर्बिट? पाहा नासाचा ‘मास्टर प्लॅन’

४५० टन वजनाचे हे स्टेशन थेट पृथ्वीवर कोसळले तर मोठा अनर्थ होऊ शकतो. म्हणूनच नासाने अत्यंत अचूक आणि सुरक्षित योजना आखली आहे. २०२८ ते २०२९ दरम्यान तिथून शेवटच्या अंतराळवीरांचा चमू सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणला जाईल. त्यानंतर या स्टेशनला खाली खेचण्यासाठी नासाने एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनीला ८४३ दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले आहे. स्पेसएक्स एक विशेष ‘यूएस डिऑर्बिट व्हेईकल’ (USDV) तयार करणार आहे, जे ड्रॅगन कॅप्सूलचे अधिक शक्तिशाली रूप असेल. हे यान आयएसएसला जोडून त्याला हळूहळू पृथ्वीच्या दिशेने खाली आणेल.

जेव्हा हे स्टेशन २८० किलोमीटर उंचीवर येईल, तेव्हा पृथ्वीचे वातावरण त्याला वेगाने मागे खेचेल. वातावरणातील घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे स्टेशनचा ९०% भाग आकाशातच जळून खाक होईल. मात्र, जे काही मोठे आणि जड तुकडे उरतील, ते पॅसिफिक महासागरातील एका अत्यंत निर्जन भागात पाडले जातील. या भागाला ‘स्पेसक्राफ्ट सिमेट्री’ (अंंतराळयान स्मशानभूमी) किंवा ‘पॉइंट निमो’ म्हणतात. येथे शेकडो किलोमीटरपर्यंत कोणतीही मानवी वस्ती किंवा बेट नाही, त्यामुळे पृथ्वीवर कोणतेही नुकसान होणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : भारताचा अमेरिकेला थेट इशारा; ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशांवर हल्ले का? MEA ने बजावला ‘डिमार्च’

आयएसएस संपल्यानंतर अंतराळात काय बदलणार?

२०३० नंतर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (Low Earth Orbit) सरकारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात येईल. ‘ॲक्सिअम स्पेस’ (Axiom Space) कंपनी २०२८ पर्यंत आपले वैयक्तिक मॉड्युल्स अंतराळात पाठवणार आहे. तसेच जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ (Blue Origin) कंपनी ‘ऑर्बिटल रीफ’ नावाचे स्पेस स्टेशन बनवत आहे, जिथे अंतराळ पर्यटनासोबतच खाजगी कंपन्यांना त्यांचे संशोधन करता येईल. याशिवाय ‘व्हॉयेजर स्पेस’ कंपनी ‘स्टारलॅब’वर काम करत आहे. म्हणजेच भविष्यात अंतराळ हे सरकारी शास्त्रज्ञांपेक्षा खाजगी कंपन्या आणि पर्यटकांसाठी अधिक खुले आणि व्यस्त होणार आहे.

Web Title: International space station iss retirement 2030 nasa spacex deorbit plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • astronauts space station
  • NASA
  • Space News

संबंधित बातम्या

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?
1

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?

Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित
2

Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.