Iran announces official end of restrictions on its nuclear programme
Iran Nuclear Programme update : तेहरान : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. इराणने (Iran) आपल्या अणु प्रकल्पाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची त्यांच्या अणु कार्यक्रमावरील २२३१ ची मुदत संपल्याचे सांगितले आहे. तसेच आता इराणच्या अणु प्रकल्पांवर कोणतीही आंतरराष्ट्रीय निर्बंध किंवा मर्याद लागू राहणार नसल्याची घोषणा केली आहे.
मात्र इराणच्या या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी जगाला गंभीर अणु धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Nepal Politics : नेपाळमध्ये पुन्हा राजकीय भूकंप! Gen Z तरुणांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
आता इराणने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी याची मुदत संपली असल्याचे घोषणा केली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करार २२३१ नुसार ठरलेले मुदत संपुष्टात आली आहे. यामुळे आता इराणच्या अणु प्रकल्पांवर कोणतीही बंधने नसतील. तसेच इराणने मागणी केली की, त्यांच्या अणु प्रकल्पाचा मुद्दा आता सुरक्षा परिषदेच्या चर्चांमदून काढण्यात यावा. त्यांनाही अण्वस्त्रविरहित देश म्हणून संबोधले जावे.
इराणने वाढवला अणु साठा
सध्या इराणच्या या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्था (IAEA) च्या मते, जगाला मोठा अणु धोका निर्माण झाला आहे. इराणने युरेनियमचा साठा ६० टक्क्यापर्यंत वाढवला आहे. यामुळे इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ असल्याचे IAEA ने म्हटले आहे. या अहवालाच्या प्रसिद्ध झाल्यानंतर जुलैमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्षही झाला होता. यामुळे इराणने IAEA सोबतचा सहकार्य करारही रद्द केला होता. इराणे IAEA वर इस्रायला त्यांच्या अंतर्गत माहिती पुरवल्याचा आरोप केला होता.
प्रश्न १. इराणने अणु प्रकल्पासंबंधित काय घोषणा केल आहे?
इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या २२३१ करारानुसार ठरलेल्या निर्बंधाची मुदत संपली असल्याचे आणि आता त्याच्यावर कोणतेही बंधन नसल्याची घोषणा केली आहे.
प्रश्न २. इराणे संयुक्त राष्ट्राकडे काय मागणी केली आहे?
इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे त्यांच्या अणु प्रकल्पाचा मुद्दा परिषदेच्या चर्चांमधून काढून टाकण्याची आणि त्यांनी अण्वस्त्रविरहित देश मानण्याची मागणी केली आहे.
प्रश्न ३. काय होता इराणवरील अणु करार?
२०१५ मध्ये करण्यात आलेल्या करारानुसार, इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्यात आली होती, ज्याबदल्यात इराणला त्यांचा युरेनियमचा साठा ३.६७ टक्क्यांपर्यंतच ठेवण्याची परवागी होती.
प्रश्न ४. इराणसोबतच्या करार कोणत्या देशांचा समावेश होता?
२०१५ च्या कराराअंतर्गत इराण, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, चीन आणि रशिया हे देश करारात सहभागी होते.