Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pak-Afghan agrees to Ceasefire : इस्लामाबाद/काबूल : गेले काही दिवस पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तीव्र संघर्ष सुरु होते. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. पण आता दोन्ही देशात तात्काळ युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. कतारची राजधानी दोहामध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी तातडीने युद्धबंदीसाठी सहमती दिली. यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी युद्धबंदीची घोषणा केली.
कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने गेले आठवडाभर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी चर्चा सुरु होती. कतारची राजधानी दोहामध्ये यावर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान इकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु होता. या संघर्षात डझनभर लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले होते. विशेष करुन यामध्ये महिला आणि मुलांना मोठा त्रास सहन करावा लागाल होता.
दरम्यान दोन्ही देशांनी युद्धबंदी लागू केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युद्धबंदी आंमलात आणण्यासाठी दोन्ही देशांत येत्या काही दिवसांच अधिक बैठका होतील. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर शाश्वती आणणे याचा उद्देश असेल.
गेल्या अनेक काळापासून दोन्ही देश एकमेकांवर दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे. तसेच २०११ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते, यावेळी पाकिस्तानने अफगाणिस्तानकडे तोंड फिरवले होते. यामुळे पाकिस्तान खोटा आणि केवळ स्वार्थी मुस्लिम देश असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या लोकांनी केला होता. एकेकाळी इस्लामिक भावंड मानले जाणाऱ्या देशात यामुळे फूट पडली होती. शिवाय २०११ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली, तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला.
दरम्यान दोन्ही देशांनी तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली तरीही यावर चिंता व्यक्त केली जात आहे. कारण दोन दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू केली होती. पण ही युद्धबंदी संपताच पाकिस्तानने हल्ला केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला होता. तसेच पाकिस्तानने १८ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या क्रिकेटपट्टूंवरही हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन खेळाडूंचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानने या हल्ल्यात डझनभर तालिबानी दहशतवादी ठार केल्याचा दावा केला होता.
प्रश्न १. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कतार, तुर्कीच्या मध्यस्थीने दोहामध्ये चर्चा झाल्यावर युद्धबंदी झाली.
प्रश्न २. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धबंदीवर कतारने काय म्हटले?
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युद्धबंदी आंमलात आणण्यासाठी दोन्ही देशांत येत्या काही दिवसांच अधिक बैठका होतील. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर शाश्वती आणणे याचा उद्देश असेल, असे म्हटले आहे.