Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

Boeing 737 : मिळालेल्या माहितीनुसार, कंपनांमुळे केबिनच्या आतील भागाचे नुकसान झाले, ज्यामुळे डोक्यावरील डबे उघडले आणि वैयक्तिक सामान आसनांवर व कॉरिडॉरमध्ये पडले. पडणाऱ्या वस्तूंमुळे काही प्रवासी जखमीही झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 17, 2026 | 03:00 PM
Iran Plane Emergency Landing Sepehran Airlines Boeing 737

Iran Plane Emergency Landing Sepehran Airlines Boeing 737

Follow Us
Follow Us:
  • उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड
  • केबिनमध्ये भीतीचे वातावरण
  • सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग

इराणमध्ये (प्रवासी विमानाचा एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. ईशान्य इराणमधील मशहद शहरातून केरमानशाहकडे जाण्यासाठी उड्डाण भरलेल्या सेपहरान एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ (Boeing 737) विमानाचा हवेत अचानक मोठा अपघात टळला. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमानातील एका चाकाचे टायर निखळले. या तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे इंजिन निकामी झाले आणि संपूर्ण विमान हवेत तीव्र गतीने हादरू लागले.

हवेत अचानक निर्माण झालेल्या या जोरदार कंपनांमुळे विमानाच्या केबिनच्या आतील भागाची मोठी मोडतोड झाली. डोक्यावरील सामानाचे कप्पे (overnead luggage bins) आपोआप उघडले आणि त्यातील भारी सामान, बॅगा थेट खाली बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर व कॉरिडॉरमध्ये कोसळू लागल्या. वरून पडणाऱ्या वस्तूंमुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे वृत्त आहे. या अत्यंत बिकट आणि भीतिदायक प्रसंगी प्रवाशांना जणू प्रत्यक्ष मृत्यूच समोर दिसत होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : देशाच्या पुनर्बांधणीसाठी नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे भारताच्या दौऱ्यावर; 1399 मृत्यू, कोट्यवधींचे नुकसान

प्रवाशांचा आक्रोश आणि थरारक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या या थरारक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानातील प्रवासी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसत असून, काही जण देवाचा धावा करताना तर काही जण भीतीने किंचाळताना ऐकू येत आहेत. विमान इतक्या वेगाने हादरत होते की प्रवाशांचे स्वतःवरील नियंत्रण सुटले होते. विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेतील प्रचंड भूकंपसदृश धक्का पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली होती.

विमानाच्या चाकाचे टायर फुटल्याचे व इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने त्वरित मशहद विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधला. प्रवाशांना विमानातील तांत्रिक बिघाडाची कल्पना देण्यात आली आणि वैमानिकाने उड्डाण पुढे न नेता तात्काळ मशहद विमानतळावर परतण्याचा धाडसी निर्णय घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा धुमाकूळ सुरूच, FPV ड्रोनने प्रवासी बसवर केला हल्ला; दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू

मशहद विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग

वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि तांत्रिक कौशल्यामुळे बोईंग ७३७ विमान मशहद विमानतळावर सुखरूप उतरवण्यात यश आले. विमानतळावर आधीच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र, सामान अंगावर पडल्यामुळे आणि घाबरल्यामुळे काही प्रवाशांना वैद्यकीय मदत द्यावी लागली.

नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या दुर्घटनेच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, चाकातील टायर निखळल्यामुळे इंजिन बंद पडले की इंजिनच्या बिघाडामुळे टायरवर अतिरिक्त ताण आला, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक विमानाची कसून पाहणी करत आहे. विशेष म्हणजे, मशहद विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सेपहरान एअरलाइन्सच्या विमानाबाबत घडलेली ही मागील काही दिवसांतील दुसरी आपत्कालीन घटना असल्याने हवाई सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Web Title: Iran boeing 737 plane shakes mid air emergency landing mashhad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • airplane news
  • iran
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
1

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!
3

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
4

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.