
Supreme Leader of Iran, Ali Khamenei
दुबई हा आर्थिकदृष्ट्या स्थिर, सुरक्षित आणि इराणशी व्यापारीक संबंध असलेल्या देश आहे. यामुळे भविष्यात खामेनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे शहर उत्तम ठरु शकते. याशिवाय रशियामध्येही खामेनी कुटुंब स्थलांरित होण्याच्या चर्चा सुर आहे. यामागचे कारण म्हणजे रशिया हा इराणचा घनिष्ठ मित्र देश आहे. यामुळे संकटाच्या काळात रशिया अधिक विश्वासार्ह साथीदार मानला जात आहे. यामुळे कदाचित खामेनी कुटुंब रशियाला देखील स्थलांतिरत होण्याची शक्यता आहे.
२८ डिसेंबर २०२५ मध्ये इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात बंड पुकारण्यात आला होता. देशांतर्गत आर्थिक संकट वाढती महागाई आणि रियालची घसरण याविरोधात हे आंदलोन सुरु झाले होते. पण याला चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला आणि पुढे जाऊन हे आंदोलन सरकारच्या दडपशाही आणि कठोर धार्मिक निर्बंधाच्या रुपात बदलेले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या आंदोलनात १२,०००हून अनेकांचा बळी गेला आहे, शेकडो लोक जखमी झाले आहेत. मानवी हक्कांचे उल्लंघन करत जबरदस्तीने लोकांना ताब्यात घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. सध्या लष्कराच्या हाती नियंत्रण असून इंटरेनेट, फोन सुविधा बंद असल्याने देशातील परिस्थितीबाबत योग्य माहिती मिळणे कठीण झाले आहे. सध्या इराणमधील परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अमेरिकेने देखील हल्ल्याचे संकेत दिले आहे. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल लागली आहे.
Ans: इराणचे सर्वोच्च नेते खामेनी दुबईला पलायन करणार असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: सध्या याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच इस्रायली मीडियाकडूनही दावा करण्यात आला आहे. परंतु अद्याप इराणच्या सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Ans: इस्रायली मीडियाच्या मते, खामेनींच्या मुलाने दुबईत कोट्यावधी रुपये ट्रान्सफर केले आहेत, यावरुनच इराणचे सर्वोच्च नेते खामेनी दुबईला पळून जात असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या आंदोलनात आतापर्यंत १२,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात प्रचंड अराजकता पसरलेली आहे.
Ans: रशिया हा इराणचा चांगला मित्र असल्याने सध्या खामेनी कुटुंब रशियामध्ये पलायन करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.