Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

THAAD : इराणने अरब देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांना वारंवार लक्ष्य केले आहे. कतारमध्ये इराणने अमेरिकेचे रडार यशस्वीरित्या नष्ट केले आहेत आणि युएईमध्ये त्यांनी THAAD प्रणालीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: मार्च 05, 2026 | 02:04 PM
iran claims destroyed us thaad system in uae pentagon troops deployment news

iran claims destroyed us thaad system in uae pentagon troops deployment news

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक सैन्य सज्जता
  • THAAD प्रणालीवर प्रहार
  • युएईसमोर मोठे संकट

Iran destroyed US THAAD in UAE news : मध्यपूर्वेतील युद्ध (Israel Iran war) आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथे केवळ दोन देश नाही तर संपूर्ण जगाची सुरक्षा व्यवस्था पणाला लागली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जगभरातील १६० देशांमध्ये आपले १,०८,००० पेक्षा जास्त सैन्य तैनात केल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. मात्र, दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या सर्वात प्रगत अशा हवाई संरक्षण यंत्रणेला खिंडार पाडल्याचा दावा करून अमेरिकन लष्करी सामर्थ्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

पेंटागॉनचा १६० देशांतील तैनातीचा दावा

अमेरिकन लष्कराचे उपप्रमुख जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांनी सिनेटच्या उपसमितीसमोर साक्ष देताना सांगितले की, अमेरिकन सैन्य सध्या अत्यंत धोकादायक वातावरणात कार्यरत आहे. जगभरातील १६० देशांमध्ये १०८,००० हून अधिक सैन्य तैनात असणे हे अमेरिकेच्या ‘ग्लोबल ऑपरेशन्स’ची ताकद दर्शवते. ही तैनाती केवळ इराणला रोखण्यासाठी नाही, तर रशिया आणि चीनकडून मिळणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे. “आम्ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास सक्षम आहोत,” असा विश्वास पेंटागॉनने व्यक्त केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

इराणचा ‘THAAD’ आणि रडारवरील भीषण हल्ला

एकीकडे अमेरिका लष्करी संख्याबळाचा दावा करत असताना, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (IRGC) ने युएई (UAE) मधील अल-रुवैस येथे तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘THAAD’ (Terminal High Altitude Area Defense) हवाई संरक्षण प्रणालीवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. या एका सिस्टिमची किंमत ५०० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. इतकेच नाही तर कतारमधील अल उदेद हवाई तळावर असलेला १.१ अब्ज डॉलर्सचा ‘AN/FPS-132’ हा रडार देखील इराणी क्षेपणास्त्राने नष्ट केल्याचे वृत्त आहे. जर इराणचे हे दावे शंभर टक्के खरे असतील, तर मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सुरक्षा कवच आता पूर्णपणे उघडे पडले आहे.

Did Iran’s cheap Shahed-136 drone “annihilate” a $1.1B US radar in Qatar? 📡❌ The evidence tells a different story:
🧵 Viral photos = AI-generated fakes
🧵 Viral video = Actually filmed in Bahrain
Full OSINT report: https://t.co/vkJZLPx4IR#FactCheck #Qatar #Iran #OSINT pic.twitter.com/Mdx5Wt6Ob5 — Dr. Adrian Wong (dradrianwong.bsky.social) (@DrAdrianWong) March 5, 2026

credit – social media and Twitter

युएईवर ८६३ क्षेपणास्त्रांचा वर्षाव: इस्रायलपेक्षा जास्त धोका

धक्कादायक बाब म्हणजे, इराणने या युद्धात इस्रायलपेक्षा जास्त युएईला लक्ष्य केले आहे. गेल्या शनिवारपासून इराणने युएईवर ८६३ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागले आहेत. युएई हे इस्रायलचे जवळचे मित्र राष्ट्र मानले जाते, त्यामुळेच इराणने दुबई आणि अबू धाबीला लक्ष्य करून अरब जगताला मोठा इशारा दिला आहे. युएईकडे असलेल्या मर्यादित ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांमुळे आणि अमेरिकन संरक्षण यंत्रणा निकामी झाल्यामुळे आता युएईने इतर मित्र राष्ट्रांकडे मदतीची याचना केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसमोर अमेरिका असहाय्य?

इराणच्या दाव्यानुसार, अमेरिकेची THAAD प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा वेग रोखण्यात अपयशी ठरली आहे. जगातील १० पैकी ७ THAAD बॅटरी अमेरिका स्वतः चालवते, तर २ युएईकडे आणि १ सौदी अरेबियाकडे आहे. युएईच्या या दोन्ही यंत्रणा नष्ट झाल्याचे उपग्रह प्रतिमांमधूनही सूचित होत आहे. यामुळे इराणला या प्रदेशात आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. इराणच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे मध्यपूर्वेतील लष्करी संतुलन पूर्णपणे बिघडले असून, आता अमेरिका यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: THAAD प्रणाली काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे?

    Ans: THAAD ही जगातील सर्वात प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे. ती शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी वापरली जाते.

  • Que: इराणने युएईला लक्ष्य का केले आहे?

    Ans: युएई हे इस्रायलचे जवळचे मित्र राष्ट्र असून तिथे अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत, त्यामुळे इराणने त्यांना दबावात ठेवण्यासाठी सर्वाधिक हल्ले केले आहेत.

  • Que: अमेरिकेने १६० देशांमध्ये सैन्य तैनात केल्याचा अर्थ काय?

    Ans: याचा अर्थ असा की अमेरिका केवळ मध्यपूर्वेतच नाही, तर रशिया आणि चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर युद्धासाठी सज्ज आहे.

Web Title: Iran claims destroyed us thaad system in uae pentagon troops deployment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • America
  • iran
  • Qatar
  • World War 3

संबंधित बातम्या

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा
1

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

US-Venezuela: ट्रम्प यांची ‘गोल्डन’ चाल! इराणशी युद्ध सुरू असताना व्हेनेझुएला अमेरिकेला देणार 1000 किलो सोने; वाचा का ते?
2

US-Venezuela: ट्रम्प यांची ‘गोल्डन’ चाल! इराणशी युद्ध सुरू असताना व्हेनेझुएला अमेरिकेला देणार 1000 किलो सोने; वाचा का ते?

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान
3

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी
4

Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.