Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO

Iran-US War: इराणने अमेरिकन एफ-३५ स्टेल्थ फायटर विमान पाडल्याचा दावा केला आहे. IRGC च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने ८२ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या या 'अदृश्य' विमानाचा रडारवर मागोवा घेऊन ते नष्ट केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 03, 2026 | 12:49 PM
iran claims shooting down us f35 stealth fighter video indigenous air defense 2026

iran claims shooting down us f35 stealth fighter video indigenous air defense 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • महाकाय झेप अन् मोठा दावा
  • स्वदेशी तंत्रज्ञानाचा चमत्कार
  • युद्धाची दिशा बदलणार

Iran shot down US F-35 stealth fighter : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे तंत्रज्ञानाची मोठी लढाई सुरू झाली आहे. अमेरिकेचे सर्वात घातक आणि जगात ‘अजेय’ मानले जाणारे ५ व्या पिढीचे ‘एफ-३५ स्टेल्थ फायटर’ (F-35 Stealth Fighter) विमान इराणने पाडल्याचा दावा केल्याने जगभरातील संरक्षण तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) या कारवाईचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला असून, यामध्ये एक क्षेपणास्त्र ढगांना भेदून विमानाचा वेध घेताना दिसत आहे.

स्वदेशी हवाई-संरक्षण प्रणालीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

इराणच्या ‘खतम अल-अंबिया’ मुख्यालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, हे यश त्यांच्या नवीन स्वदेशी हवाई-संरक्षण प्रणालीमुळे मिळाले आहे. एफ-३५ ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञान, ज्यामुळे ते शत्रूच्या रडारला ‘अदृश्य’ राहू शकते. मात्र, इराणचा दावा आहे की त्यांच्या प्रगत रडार प्रणालीने या अदृश्य विमानाचा अचूक मागोवा घेतला आणि क्षेपणास्त्राने त्याला हवेतच टिपले. या घटनेत वैमानिक वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे बोलले जात आहे. इराणसाठी हा अमेरिकेविरुद्धचा सर्वात मोठा प्रतिशोध मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन

F-35: ७६४ कोटींचे ‘अदृश्य’ मशिद का आहे खास?

एफ-३५ हे केवळ विमान नसून ते अमेरिकेच्या लष्करी ताकदीचे प्रतीक आहे. एका विमानाची किंमत अंदाजे ८२.५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७६४ कोटी रुपये) आहे. शत्रूच्या प्रदेशात न कळता शिरणे, गुप्त माहिती काढणे आणि अचूक बॉम्बफेक करणे यात हे विमान जगात सर्वोत्तम मानले जाते. मात्र, १९ मार्च रोजी झालेल्या पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर, आता इराणने हे विमान थेट पाडल्याचा दावा केल्याने अमेरिकेचा तणाव प्रचंड वाढला आहे.

Another enemy F-35 hit and downed by our #indigenous defence systems. Iran is a force to be reckoned with.#Iran#F35#War pic.twitter.com/q1DhkTXrm3 — Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 3, 2026

credit – social media and Twitter

युद्धाचे समीकरण बदलणार?

जर इराणचा हा दावा खरा ठरला, तर अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांच्या धोरणांना मोठा धक्का बसेल. आतापर्यंत अमेरिका आपल्या स्टेल्थ विमानांच्या जोरावर इराणवर दबाव टाकत होती. पण आता इराणच्या क्षेपणास्त्र प्रणालीने या विमानांना आव्हान दिल्यास अमेरिकेला आपली रणनीती बदलावी लागेल. अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे हे विमान पाडल्याचे मान्य केलेले नाही, मात्र इराणने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे जागतिक स्तरावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन

 तंत्रज्ञानाचा नवा संघर्ष

इराणने अमेरिकेच्या सर्वात प्रगत तंत्रज्ञानाला दिलेले हे आव्हान केवळ एका विमानापुरते मर्यादित नाही. हे इराणच्या वाढत्या लष्करी आणि तांत्रिक स्वावलंबनाचे प्रतीक आहे. इराण आणखी हल्ल्यांची योजना आखत असल्याची चेतावणी अमेरिकेने आधीच दिली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेचे कोणते विमान पाडल्याचा दावा केला आहे?

    Ans: इराणने अमेरिकेचे सर्वात प्रगत ५ व्या पिढीचे एफ-३५ (F-35) स्टेल्थ फायटर विमान पाडल्याचा दावा केला आहे.

  • Que: एफ-३५ विमानाची किंमत आणि खास वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: एफ-३५ ची किंमत सुमारे ८२.५ दशलक्ष डॉलर्स आहे. त्याचे मुख्य वैशिष्ट्य 'स्टेल्थ' तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे ते रडारला अदृश्य राहते.

  • Que: इराणने हे विमान कशाच्या सहाय्याने पाडले?

    Ans: इराणचा दावा आहे की त्यांनी स्वतः विकसित केलेल्या (स्वदेशी) प्रगत हवाई-संरक्षण प्रणाली आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर करून हे विमान पाडले.

Web Title: Iran claims shooting down us f35 stealth fighter video indigenous air defense 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?
1

युद्धाचे धगधगते 80 दिवस! अखेर Iran ने उघडलं आपलं Stock Market; ग्लोबल मार्केटवर काय होणार परिणाम?

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ
2

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!
3

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा
4

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.