Death toll in Iran's Abbas Port explosion rises to 40
तेहरान: इराणच्या प्रमुख आणि सर्वात मोठ्या बंदरांपैकी अब्बास बंदरावर शनिवारी (26 एप्रिल) भीषण स्फोट झाला. या स्फोटातील मृतांचा आकडा 40 वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 500 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचा भडका वाढत चालला असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (26 एप्रिल) इराणच्या अब्बास बंदराच्या दक्षिण भागातील राजाई बंदरावर हा भीषण स्फोट झाला. या भागामध्ये इराणचे तेल आणि पेट्रोकेमिकलचे मोठे कंटेनर होते. सुरुवातील कोणतीही जीवीतहानी आणि वित्तहानीच्या नुकसानीची माहिती समोर आली नव्हती. परंतु नंतर आग अधिक भडकत गेली. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच शिपिंग कंटेनरवरील स्टीलच्या सळई देखील तुटली यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा इराण आणि अमेरिकेचे अधिकारी इराणच्या अणु कार्यक्रमार चर्चा करण्यासाठी तिसऱ्यांदा ओमानच्या भेटीला गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी रात्रीपर्यंत विविध भागातील आग विझवण्याचे कार्य सुरुच होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी हेलिकॉप्टरच्या मदतीन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान स्फोटा मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बंदरातील रसायनांमुळे स्फोट झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, “इराण सध्या या स्फोटामागील कारणाचा शोध घेत आहे, हा हल्ला असल्यास याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या सुरक्षा व्यवस्था सज्ज आणि सतर्क आहेत.” हा स्फोट झाला त्यावेळी रॉकेट इंधनाचा एक कंटेनर जहाज बंदरावर आले होते.
इराणचे अब्बास बंदर हे इराणच्या (राजाई बंदर) हे इराणच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. या बंदरावर इराणच्या कच्चा तेलाचे टॅंकर्स आणि पेट्रोकेमिकल सुविधा आहे. तसेच इराणच्या अणु कार्यक्रमासाठी लागणाऱ्या युरेनियमचा साठी देखील या ठिकाणी आहे. इराणचे राजाई बंदर हे इराणच्या राजधानी तेहरापासून 1 हजार 50 किलोमीटर अंतरावर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर स्थित आहे. होर्मुझ पर्शियन आखातामधील एक अरुंद मार्ग आहे. या मार्गाने इराणचा 20% तेल व्यापर होतो.