Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait : ‘आम्हाला जागाच आठवत नाही!’ इराणच्या ‘या’ उत्तराने अमेरिकाही चक्रावली; होर्मुझमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा

US-Iran War: अमेरिकेने उघड केले आहे की, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये खोदलेल्या पाणबुडी बोगद्यांचे नेमके ठिकाण विसरला असून, त्यामुळे जागतिक तेल व्यापाराला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 11, 2026 | 12:06 PM
iran forgets sea mines location strait of hormuz us claims oil crisis 2026

iran forgets sea mines location strait of hormuz us claims oil crisis 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची मोठी घोडचूक
  • जागतिक व्यापाराला धोका
  • शांतता चर्चेत अडथळा

Iran forgets mines location Hormuz Strait : जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून (Strait of Hormuz) एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भीतीदायक बातमी समोर येत आहे. अमेरिकन वृत्तसंस्था ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या एका अहवालानुसार, इराणने अमेरिकेला रोखण्यासाठी समुद्रात जे सुरुंग पेरले होते, ते आता इराणसाठीच गळफास ठरले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की, इराणने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर सुरुंग (Mines) पेरले, पण आता तेहरानलाच त्या सुरुंगांचे नेमके ठिकाण शोधता येत नाहीये. यामुळे हा मार्ग पुन्हा उघडणे आता इराणच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

नेमकं काय घडलं? इराण का विसरला ठिकाण?

यामागील तांत्रिक कारण अतिशय गंभीर आहे. इराणने जे सुरुंग वापरले आहेत, त्यातील काही सुरुंग समुद्राच्या प्रवाहाबरोबर आपली जागा बदलू शकतात. समुद्रातील पाण्याच्या हालचालीमुळे हे सुरुंग पेरलेल्या ठिकाणापासून दूर वाहून गेले आहेत. इराणकडे असलेले जुन्या धाटणीचे तंत्रज्ञान या बदललेल्या जागांचा मागोवा घेण्यास असमर्थ ठरले आहे. परिणामी, इराणला आता हेच माहित नाही की कोणता भाग जहाजांसाठी सुरक्षित आहे आणि कुठे मृत्यू दबा धरून बसला आहे. या ‘मिसमॅनेजमेंट’मुळे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आता स्वतःच संभ्रमात पडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

जागतिक बाजारपेठेत दहशतीचे वातावरण

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची जीवनवाहिनी मानली जाते. जगातील एकूण तेल आणि एलएनजी व्यापारापैकी २० टक्के व्यापार याच चिंचोळ्या मार्गातून होतो. इराणने सध्या केवळ एक अरुंद मार्ग खुला ठेवला असून, तिथून जाणाऱ्या जहाजांकडून भरमसाठ ‘टोल’ वसूल केला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, जर इराणला हे सुरुंग हटवता आले नाहीत, तर जहाजवाहतुकीचा विमा (Insurance) प्रचंड महाग होईल आणि जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडतील. भारतासारख्या देशांसाठी हे संकट अधिक मोठे आहे, कारण आपली ऊर्जा सुरक्षा याच मार्गावर अवलंबून आहे.

JUST IN – Iran’s been unable to quickly open the Strait of Hormuz to more shipping traffic since it cannot locate all the mines it laid in the waterway and now lacks the capability to remove them, say U.S. officials — NYT pic.twitter.com/tsrW3Ayaeu — Disclose.tv (@disclosetv) April 10, 2026

credit – social media and Twitter

इस्लामाबादमधील शांतता चर्चेवर टांगती तलवार

विशेष म्हणजे, हा खुलासा अशा वेळी झाला आहे जेव्हा पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ऐतिहासिक चर्चा सुरू आहे. ट्रम्प प्रशासन आणि इराणचे प्रतिनिधी शस्त्रसंधीसाठी एकत्र आले आहेत. मात्र, अमेरिकेने इराणच्या या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे चर्चेत नवा अडथळा निर्माण झाला आहे. जर इराणला स्वतःचे सुरुंग काढता येत नसतील, तर अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र या मार्गावर आपले लष्करी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पडू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Peace Talks : ‘अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसला!’ इस्लामाबादमध्ये उतरताच गालिबाफ यांची जुन्या जखमांची उकल

सुरुंग काढण्यासाठी लागणार कित्येक महिने?

तज्ञांच्या मते, हा परिसर पूर्णपणे सुरुंगमुक्त करणे हे एक महाभयंकर आव्हान आहे. अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांकडे आधुनिक सुरुंग-शोधक जहाजे आणि तंत्रज्ञान असले, तरी अथांग समुद्राच्या तळाशी असलेले हे सुरुंग शोधून ते निकामी करण्यासाठी किमान काही आठवडे ते अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत जागतिक पुरवठा साखळी तणावाखाली राहणार आहे. इराणची ही एक चूक आता संपूर्ण जगाला महागात पडणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणबद्दल कोणता खळबळजनक दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेनुसार, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरले आहेत, परंतु आता ते त्यांचे नेमके ठिकाण विसरले आहेत, ज्यामुळे हा मार्ग उघडणे कठीण झाले आहे.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिल्यास जगावर काय परिणाम होईल?

    Ans: जगातील २०% तेल आणि वायू पुरवठा विस्कळीत होईल, ज्यामुळे इंधनाचे दर प्रचंड वाढतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येऊ शकते.

  • Que: सुरुंग हटवण्यासाठी किती वेळ लागू शकतो?

    Ans: तज्ञांच्या मते, आधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यासाठी काही आठवड्यांपासून ते कित्येक महिन्यांचा काळ लागू शकतो.

Web Title: Iran forgets sea mines location strait of hormuz us claims oil crisis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर
1

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर

Islamabad Peace Talks : ‘अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसला!’ इस्लामाबादमध्ये उतरताच गालिबाफ यांची जुन्या जखमांची उकल
2

Islamabad Peace Talks : ‘अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसला!’ इस्लामाबादमध्ये उतरताच गालिबाफ यांची जुन्या जखमांची उकल

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक 
3

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक 

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य
4

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.