Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार

इराणने असा दावा केला आहे की त्यांच्या कठोर इशाऱ्यामुळे अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवरील हल्ले रोखले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांत वाकयुद्ध रंगले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 06:35 PM
"आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा पलटवार (Photo Credit- X)

"आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा पलटवार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा पलटवार
  • काय होती डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका?
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धाच्या वणव्यात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर, इराणने यावर आपली पहिली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “इराणने दिलेल्या कठोर इशाऱ्यामुळेच अमेरिका घाबरली असून त्यांनी आपल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील (Energy Infrastructure) हल्ल्याची योजना गुंडाळली आहे,” असा दावा काबूलमधील इराणच्या दूतावासाने केला आहे.

इराणचा दावा: ‘धमकीमुळेच ट्रम्प मागे हटले’

इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने वृत्तसंस्था ‘एपी’च्या (AP) हवाल्याने म्हटले आहे की, इराणच्या सडेतोड इशाऱ्यासमोर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना माघार घ्यावी लागली. इराणने स्पष्ट शब्दांत बजावले होते की, “जर आमच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले गेले, तर आम्ही संपूर्ण क्षेत्रातील ऊर्जा व्यवस्था उद्ध्वस्त करू.” या इशाऱ्यामुळेच ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला लष्करी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले, असा दावा इराणच्या दूतावासाकडून करण्यात आला आहे.

عقب‌نشینی ترامپ پس از هشدار قاطع ایران پس از آن‌که جمهوری اسلامی تهدید کرد که در صورت هرگونه حمله آمریکا به زیرساخت‌های انرژی ایران، زیرساخت‌های انرژی کل منطقه را هدف قرار می‌دهد، ترامپ عقب نشست و گفت که دستور تعویق حمله را صادر کرده است. pic.twitter.com/3Jcl3k5YDN — Embassy of the I.R. Iran in Kabul, Afghanistan (@IRANinKabul) March 23, 2026

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

काय होती डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका?

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत माहिती दिली होती की, अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या दोन दिवसांत सकारात्मक आणि विधायक चर्चा झाली आहे. या चर्चेला वाव देण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी इराणच्या वीज प्रकल्पांवर होणारे संभाव्य हल्ले 5 दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहेत. मात्र, इराणने याला अमेरिकेचा ‘पराभव’ किंवा ‘भीती’ असे स्वरूप दिले आहे.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरून सुरू असलेला पेच

या वादाच्या मुळाशी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी) ही जागतिक तेल व्यापाराची महत्त्वाची वाहिनी आहे. ट्रम्प यांनी इराणला 24 तासांपूर्वी इशारा दिला होता की, “जर 48 तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली नाही, तर इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले जाईल.” या धमकीला प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक ऊर्जा संकट ओढवण्याचा इशारा दिला होता. आता दोन्ही देश लष्करी कारवाई ऐवजी कूटनीतिक मार्ग चोखाळताना दिसत असले तरी, पडद्यामागे तणाव कायम आहे.

‘मनोवैज्ञानिक युद्ध’ सुरूच राहणार

इराणची वृत्तसंस्था ‘तसनीम’ने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, जोपर्यंत हा ‘मानसिक संघर्ष’ सुरू राहील, तोपर्यंत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील स्थिती युद्धपूर्व काळाप्रमाणे सामान्य होणार नाही. म्हणजेच, अमेरिका आणि इराणमधील चर्चा यशस्वी होईपर्यंत जागतिक तेल पुरवठ्यावरील टांगती तलवार कायम राहणार असल्याचे संकेत इराणने दिले आहेत.

Hormuz Strait crisis: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी? 

Web Title: Iran hits back at donald trumps statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • Iran US Israel
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.