Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन

US Iran War Update : अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. इराणने आखाती देशांमधील आठ प्रमुख पुलांची लक्ष्य यादी जाहीर केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 03, 2026 | 12:26 PM
iran hits list 8 bridges gulf countries us iran war update 2026

iran hits list 8 bridges gulf countries us iran war update 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची ‘हिट लिस्ट’ जाहीर
  • आखाती देशांना थेट इशारा
  • युद्धाचा नवा भडका

Iran hit list 8 bridges 2026 : अमेरिका आणि इराणमधील युद्ध (US-Israel Iran War) आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. एका महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षात आता दोन्ही देशांनी एकमेकांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (२ एप्रिल २०२६) अमेरिकेने केलेल्या एका जोरदार हल्ल्यात इराणचा अभिमान असलेला आणि मध्य-पूर्वेतील सर्वात उंच ठरणारा ‘बी-१’ पूल उद्ध्वस्त झाला. या अपमानाचा सूड घेण्यासाठी इराणने आता आखाती देशांमधील ८ प्रमुख पुलांची ‘हिट लिस्ट’ जाहीर करून जगाला धक्का दिला आहे.

इराणच्या निशाण्यावर असलेले ८ प्रमुख पूल

इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) आपल्या संभाव्य लक्ष्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये कुवेतचा जगप्रसिद्ध शेख जाबेर अल-अहमद अल-सबाह सागरी पूल, संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) शेख झायेद पूल, अल मक्ता पूल आणि शेख खलिफा पूल यांचा समावेश आहे. तसेच, सौदी अरेबियाला बहरीनशी जोडणारा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा किंग फहद कॉजवे आणि जॉर्डनमधील किंग हुसेन पूल, दामिया पूल व अब्दौन पूल यांनाही इराणने टार्गेट लिस्टमध्ये ठेवले आहे. हे सर्व पूल त्या त्या देशांची जीवनवाहिनी मानले जातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East War: अयातुल्लांनंतर आता फथ’अलीझादेह; अमेरिका-इस्रायलच्या एका प्रहाराने इराणचे ‘फतेहीन’ युनिट अनाथ

‘बी-१’ पुलाचा विध्वंस आणि इराणचा संताप

इराणचा ‘बी-१’ पूल हा तेहरानला करज शहराशी जोडणारा एक महाकाय प्रकल्प होता. तो पूर्णपणे तयार झाला नव्हता, तरीही अमेरिकेने त्यावर दोनदा क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आपल्या देशातील प्रगतीचे प्रतीक असलेल्या पुलावर अमेरिकेने घाला घातल्याने इराणचा पारा चढला आहे. “जसे आमचे पूल पडले, तसेच तुमचेही पडतील,” असा उघड इशारा इराणने दिला आहे.

🔺 Iran state TV highlights regional bridges as potential targets after U.S. strikes on Iranian infrastructure ➤ Sheikh Jaber Al-Ahmad Bridge — Kuwait
➤ King Fahd Causeway — Saudi Arabia–Bahrain
➤ Sheikh Zayed Bridge — Abu Dhabi
➤ Al Maqta Bridge — Abu Dhabi
➤ King Hussein… https://t.co/Eb8Yrt9gvU
— Drop Site (@DropSiteNews) April 2, 2026

credit – social media and Twitter

आखाती देशांमध्ये घबराट आणि सुरक्षिततेचा प्रश्न

इराणच्या या धमकीमुळे आखाती देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेषतः कुवेत आणि यूएई सारख्या व्यापारी केंद्रांना इराणच्या या कृतीमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जॉर्डनमधील पुलांना लक्ष्य केल्यास तिथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. अमेरिकेने इराणच्या अंतर्गत भागात हल्ले केल्यामुळे इराण आता अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना (Allies) त्रास देऊन अमेरिकेवर दबाव आणण्याची रणनीती आखत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tariff Bomb : ‘आमच्याकडे कारखाने उभारा, नाहीतर 100% टॅरिफ भरा’ डोनाल्ड ट्रम्पनी पुन्हा जगाला दाखवला कराचा माज

 जागतिक शांतता धोक्यात

एक महिना उलटूनही हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उलट, इराणने आता कॉर्पोरेट कंपन्यांनंतर पुलांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्याने हे युद्ध ‘टोटल वॉर’मध्ये रूपांतरित होताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण आता कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे दिसत आहे. यामुळे जागतिक तेल व्यापार आणि वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने पुलांना लक्ष्य करण्याची धमकी का दिली?

    Ans: अमेरिकेने इराणचा सर्वात उंच 'बी-१' पूल उद्ध्वस्त केल्यामुळे, त्याचा बदला घेण्यासाठी इराणने आखाती देशांमधील ८ पुलांची यादी जाहीर केली आहे.

  • Que: इराणच्या यादीत कोणते महत्त्वाचे पूल आहेत?

    Ans: यामध्ये कुवेतचा शेख जाबेर पूल, यूएईचा शेख झायेद पूल, सौदी-बहरीनचा किंग फहद कॉजवे आणि जॉर्डनचे ३ प्रमुख पूल यांचा समावेश आहे.

  • Que: 'बी-१' पूल कुठे आहे?

    Ans: हा पूल इराणमध्ये असून तो तेहरानला करज या शहराशी जोडतो. अमेरिकेच्या हल्ल्यात तो पूर्णपणे नष्ट झाला आहे.

Web Title: Iran hits list 8 bridges gulf countries us iran war update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या 
1

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या 

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम
2

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम

RIC Group: अमेरिकेची राजवट धोक्यात! पुतिन यांच्या गुरूची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? ‘हे’ तीन देश एकत्र येऊन बदलणार सत्ताकारण
3

RIC Group: अमेरिकेची राजवट धोक्यात! पुतिन यांच्या गुरूची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? ‘हे’ तीन देश एकत्र येऊन बदलणार सत्ताकारण

China Flood: चीनमध्ये पुरामुळे प्रचंड विध्वंस; 25 जणांचा गेला बळी, तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर; पाहा VIDEO
4

China Flood: चीनमध्ये पुरामुळे प्रचंड विध्वंस; 25 जणांचा गेला बळी, तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर; पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.