Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणमध्ये कठोर हिजाब कायदा; महिलांनी ड्रेस कोडचे उल्लंघन केल्यास मृत्यूदडांची शिक्षा

इराण आपल्या कठोर कायद्यांसाठी ओळकला जातो. नुकतेच इराणने एक नवीन कायदा लागून केला आहे. हा कायदा हिजाबसंबंधित असून या कायद्यांतर्गत महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2024 | 07:20 PM
इराणमध्ये कठोर हिजाब कायदा; महिलांनी ड्रेस कोडचे उल्लंघन केल्यास मृत्यूदडांची शिक्षा

इराणमध्ये कठोर हिजाब कायदा; महिलांनी ड्रेस कोडचे उल्लंघन केल्यास मृत्यूदडांची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: इराण आपल्या कठोर कायद्यांसाठी ओळकला जातो. नुकतेच इराणने एक नवीन कायदा लागून केला आहे. हा कायदा हिजाबसंबंधित असून या कायद्यांतर्गत महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या नवीन कायद्यानुसार, महिलांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच अनुच्छेद 60 च्या अंतर्गत, दोषी महिलांना दंड, फटके किंवा कठोर तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते.

जर एखादी महिला एकापेक्षा जास्त वेळा हिजाब नियमांचे उल्लंघन करताना आढळली, तर तिला 15 वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा किंवा फाशीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, इराणी अधिकाऱ्यांनी हिजाब नियम पाळण्यासाठी वादग्रस्त हिजाब क्लिनिक उघडण्याची घोषणा केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Martial Law: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अध्यक्षीय पदाचे अधिकार निलंबित

परकीय माध्यमांवर कठोर कारवाई

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इराणने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या परकीय मीडिया किंवा संस्थेने हिजाबविरोधी विचारांना प्रोत्साहन दिले, तर त्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 12,500 पाउंडपर्यंत दंड भोगावा लागेल. तसेच, जर कोणी महिला अटक टाळण्यासाठी हस्तक्षेप केला, तर त्यांनाही शिक्षा दिली जाईल. अशा व्यक्तींना थेट तुरुंगात टाकण्याचेही अधिकार सरकारने स्पष्ट केले आहेत.

2022 च्या हिजाबविरोधी आंदोलनाची पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी हिजाब अनिवार्य करण्यात आला. मात्र, 2022 साली या हिजाब कायद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. यामागे 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूची घटना घडली होती. ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मोरल पोलिसांनी तिला अटक केली होती. तिच्या मृत्यूनंतर देशभरात प्रचंड विरोध प्रदर्शन झाले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. सरकारने या आंदोलनांना दबवण्यासाठी हजारो लोकांना अटक केली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेधाची लाट

इराणमध्ये लागू करण्यात आलेल्या या नवीन कायद्यांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होतो आहे. मानवी हक्क संघटनांनी आणि जागतिक समुदायाने या कायद्यांना महिलांच्या अधिकारांवर आघात मानले आहे. हे कायदे महिलांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालतात, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

परंतु इराण सरकारने स्पष्ट केले आहे की हिजाबची संस्कृती टिकवणे आणि महिलांना विशिष्ट ड्रेस कोडचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा या कायद्यांचा मुख्य उद्देश आहे.हे नवीन कायदे इराणमधील महिलांसाठी अत्यंत कठीण स्थिती निर्माण करत आहेत, तसेच जागतिक स्तरावर मानवी हक्कांसाठी एक मोठा प्रश्न उभा करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाने युक्रेनवर डागली 60 हून अधिक क्षेपणास्त्रे; ड्रोननेही केले हल्ले, वीज प्रकल्पांना लक्ष्य

Web Title: Iran imposees strict hijab law death penalty for offenders nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • iran
  • world

संबंधित बातम्या

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा
1

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार
2

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर
3

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.