फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरुसेलम: रशिया-युक्रेन युद्ध सध्या शिगेला पोहोचले आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर डझनभर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. रशियाने 93 मिसाइल आणि 200 ड्रोन हल्ले युक्रेनवर केले आहेत.या हल्ल्यात युक्रेनच्या पॉवर ग्रीड आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य करण्यात आले आहे. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात आंचरराष्ट्रीय समुदायाला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
झेलेन्स्की यांनी सांगितल आहे की, रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनच्या उर्झा प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रसियाचा हा तीन वर्षातील सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले. युक्रेनच्या हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने हल्ल्यासाठी क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला. तसेच एका खाजगी थर्मल पॉवर प्लांटसह विविध वाहतूक जाळ्यांवर हल्ला करण्यात आला.
रशियाचा हेतू
युक्रेनच्या सैन्याने मात्र रशियाने दागलेल्या 81 मिसाइल हवेतीलच नष्ट केल्याचे सांगितले, यामध्ये 11 क्रूझ मिसाइल्सचा समावेश होता. या कार्यासाठी अमेरिकन F-16 लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. रशियाचे लक्ष्य युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्रावर आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, युक्रेनमध्ये वीज आणि पाण्याची टंचाई निर्माण करून थंडीच्या हंगामात नागरिकांना त्रस्त करणे हा या हल्ल्यांमागचा उद्देश आहे. यामुळे युक्रेनच्या संरक्षण उत्पादनांवरही परिणाम होतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर सतत हल्ले होत आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दहशतवाद संपवण्यासाठी जगभरातील देशांना आवाहन
राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील देशांना एकत्र येऊन रशियाच्या दहशतवादी कारवायांविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की रशिया आपल्या दहशतीच्या रणनीतीने लाखो लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदाला आवाहन करतो की, व्लादिमिर पुतिन आपण यांच्या विरोधात एकजूट व्हावे, तरच हा दहशतवाद संपेल असे ते म्हणाले.
रशियाचे प्रत्युत्तर
रशियाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांबाबत एक निवेदन जाही केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हे हल्ले युक्रेनने केलेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन या हल्ल्यांच्या काही दिवस आधीच रशियावर अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. यामुळे प्रत्युत्तर दाखल रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केल्याचे संरक्षण दलाने म्हटले आहे. मात्र, रशियाचा हल्ला आणि युक्रेनचे प्रत्युत्तरामुळे युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे.
किती ताकदवर आहे रशियाचे क्षेपणास्त्र?
रशियाचे किंजल हापसॉनिक क्षेपणास्त्रे अतिशय वेगवान आहे. हे क्षेपणास्त्र 2017 साली रशियाच्या सैन्यात समाविष्ट करण्यात आले होते. ही मिसाईल ध्वनीच्या वेगापेधा पाच पटीने जास्त वेगाने प्रवास करते. तसेच या मिसाईलची मारक क्षमता 1200 माईल असून एका वेली 480 किलो स्फोट नेण्याची ताकद यामध्ये आहे.