
iran official threatens to arrest donald trump like maduro us intervention warning 2026
Iran official threat to arrest Donald Trump : जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता इराणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना थेट धमकी दिली आहे. “ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी मादुरो यांच्या बेडरूममध्ये घुसून त्यांना अटक केली, त्याच पद्धतीने ट्रम्प यांनाही परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे इराणचे वरिष्ठ नेते हसन रहिमपूर अझघादी यांनी म्हटले आहे.
इराणच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य असलेल्या हसन रहिमपूर अझघादी यांनी एका सार्वजनिक भाषणात ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “इराणने आता गप्प बसून चालणार नाही. ट्रम्प यांनी मादुरो यांच्या बाबतीत जे केले, तसेच उत्तर इराणने दिले पाहिजे. ट्रम्प यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात किंवा नंतरही अटक केली जाऊ शकते.” इतकेच नाही तर अमेरिकेतील कोणत्याही राज्यात किंवा शहरात अमेरिकन अधिकाऱ्यांविरुद्ध हानिकारक कारवाया करणे हे इराणसाठी ‘योग्य’ असल्याचे धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर
दुसरीकडे, व्हाईट हाऊसमध्ये तेल आणि वायू कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट ताकीद दिली आहे. इराणमध्ये सध्या महागाई आणि आर्थिक संकटावरून मोठे उठाव सुरू आहेत. ट्रम्प म्हणाले, “आम्ही इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर इराणी सरकारने पूर्वीप्रमाणे निदर्शकांवर गोळीबार केला किंवा त्यांना ठार मारले, तर अमेरिका शांत बसणार नाही. आम्ही हस्तक्षेप करू.” ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, हस्तक्षेप म्हणजे जमिनीवर सैन्य पाठवणे नव्हे, तर इराणच्या अशा ठिकाणांना लक्ष्य करणे आहे जिथे त्यांना सर्वात जास्त ‘वेदना’ होतील.
Iran’s efforts to quell a wave of anti-government protests have been complicated by Donald Trump’s threat to intervene on their side, a warning firmly underlined by the subsequent US capture of Venezuela’s Nicolas Maduro, officials and insiders said https://t.co/hpmOTaA4h0 1/5 pic.twitter.com/3OL2gKcaJe — Reuters (@Reuters) January 6, 2026
credit : social media and Twitter
अमेरिकेच्या ‘नाईट स्टॉकर्स’ आणि ‘नेव्ही सील्स’नी ज्या पद्धतीने मादुरो यांना त्यांच्या घरातून ओढून काढले, त्यामुळे इराणचे नेतृत्व धास्तावले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आरोप केला आहे की, इराणमधील जनता ट्रम्प यांना खुश करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. रशिया आणि चीननेही अमेरिकेच्या या भूमिकेचा निषेध केला असला, तरी ट्रम्प मात्र ‘लॉक्ड अँड लोडेड’ (हल्ल्यासाठी सज्ज) असल्याचे सांगत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
इराणचा रियाल (चलन) डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरला असून तिथली अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशातच अमेरिकेने रशियन तेलावर लावलेले ५००% शुल्क आणि इराणच्या ‘शॅडो फ्लीट’वर केलेली कारवाई यामुळे इराणची कोंडी झाली आहे. जर इराणने निदर्शकांवर बळाचा वापर केला, तर ट्रम्प प्रशासन इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर किंवा लष्करी तळांवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे.
Ans: अमेरिकेने नुकतीच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अटक केली आहे. ट्रम्प यांनी इराणच्या निदर्शनांमध्ये हस्तक्षेप करण्याची घोषणा केल्याने संतापलेल्या इराणी नेत्याने ट्रम्प यांनाही तशाच अटकेची धमकी दिली आहे.
Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, जर इराणी सरकारने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला किंवा त्यांची हत्या केली, तर अमेरिका 'मोठा लष्करी हस्तक्षेप' करेल आणि इराणच्या संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करेल.
Ans: हा एक लष्करी वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ असा की अमेरिकेची शस्त्रास्त्रे आणि सैन्य हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार असून केवळ आदेशाची प्रतीक्षा आहे.